ETV Bharat / bharat

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्येकडील राज्यात आंदोलन सुरू

नागरिकत्व कायदा सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्यकडील राज्यात नागरिक आणि विद्यार्थांचे आंदोलन सुरू असून परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

आंदोलन सुरू
आंदोलन सुरू
author img

By

Published : Dec 11, 2019, 12:55 PM IST

Updated : Dec 11, 2019, 10:28 PM IST

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा विधेयक 2019 लोकसभेत मंजूर झाले असून हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकाविरोधात ईशान्यकडील राज्यात नागरिक आणि विद्यार्थांचे आंदोलन सुरू असून परिस्थिती अधिकच बिघडली आहे.

नागरिकत्व कायदा आणि एनआरसी याबाबत बोलत आहेत, ईटीव्ही भारत आसामचे वृत्तसमन्वयक मृणाल दास

असाम, त्रिपुरा, मणिपुर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे रस्ते बंद असून दोन महिन्याच्या लहान मुलाचा रुग्णालयात न पोहचू शकल्यामुळे मृत्यू झाला आहे. निदर्शकांनी विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान आणि गृहमंत्र्याचे प्रतिकात्मक पुतळे जाळले आहेत.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात ईशान्यकडील राज्यात आंदोलन सुरू

राज्यातील अनेक जिल्ह्यांत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आज हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. राज्यसभेच्या काळात आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

PROTEST AGAINST CITIZENSHIP AMENDMENT BILL IN NORTH EAST
नागरिक आणि विद्यार्थी रस्त्यांवर

निदर्शकांनी टायर जाळून रस्ते केले बंद आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पास झाले तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवले जाईल. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या गैर मुस्लिम नागरिकांना यामुळे नागरिकत्व मिळणार आहे. यात फक्त मुस्लिमांना वगळण्यात आले आहे.

ईशान्य भारतातील राज्ये याला विरोध करत आहेत. १९८५ च्या आसाम कायद्यानुसार १९७१ च्या नंतर आलेल्या सर्व नागरिकांना बेकायदेशीर ठरवले आहे. त्यात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही. पण, भाजप सरकार फक्त मुस्लिमांना वगळून इतरांना नागरिकत्व देऊ पाहत आहे. याचा निषेध ईशान्येतील राज्ये करत आहेत.

যোৰহাটৰ পৰিৱেশ অপৰিবত্তীত।।হাজাৰ হাজাৰ জনতাৰ প্ৰতিবাদত উত্তাল উপায়ুক্ত কায্যলয়ৰ সন্মুখ।।

ক্ৰমান্বয়ে যোৰহাটৰ পৰিৱেশ আৰু পৰিস্থিতি ভয়ংকৰ পৰা ভয়ংকৰ হৈ পৰিছে।হাজাৰ হাজাৰ লোকে চহৰখনৰ বিভিন্ন ঠাইৰ পৰা প্ৰতিবাদী সমদল কৰি উলাই আহি পৰিৱেশ উত্তাল কৰি তুলিছে।সমগ্র বৰুৱা চালিত এতিয়া ৮৩ আন্দোলনৰ পৰিৱেশ।আৰক্ষীৰ হাতত নাই এতিয়া পৰিস্থিতি নিয়ন্ত্ৰণ।নিয়ন্ত্ৰণ বাহিৰত হৈ পৰিল যোৰহাটৰ পৰিৱেশ।সমগ্ৰ চহৰত এতিয়া চেপা উত্তেজনা।বন্ধ হৈ পৰিল সকলো ব্যৱসায়িক প্ৰতিষ্ঠান।
Last Updated : Dec 11, 2019, 10:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.