नवी दिल्ली - कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कोरोना चाचणी करणाऱ्या लॅबची संख्या तुलनेने कमी आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 23 कोटी इतकी आहे. मात्र, कोरोना तपासणी केंद्रांची संख्या फक्त 7000 इतकीच आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे कोरोना तपासणी केंद्र वाढवण्याची मागणी केली आहे.
कोरोना तपासणी केंद्रासोबतच सॅनिटायझर्स आणि मास्कचा साठा देखील वाढवण्यात यावा, असे त्यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.
भिलवाडा येथे अवघ्या 9 दिवसात 24 लाख लोक कोरोनाबाधित झाले आहेत. रुग्णांची तपासणी करणारे केंद्र कमी असल्याने संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी उपाययोजना करण्यात याव्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांनी एनजीओ, सामाजिक संस्था आणि राजकिय कार्यकर्त्यांना देखील आवाहन केले आहे. की, काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना जी मदत शक्य होईल ती करण्यासाठी तयार आहेत. सध्या राजकिय मतभेद दूर सारून आपल्याला एकत्रीत येऊन काम करावे लागणार आहे. जेणेकरुन या कठीण परिस्थितीशी लढा देता येईल, असेही त्यांनी या पत्रात लिहले आहे.
जे लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, त्यांनी अधिक खबरदारी बाळगावी. रुग्ण स्वत:हुन तपासणी करण्यासाठी येतील, अशी वातावरण निर्मिती करायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.