नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी माजी ज्येष्ठ भाजपा नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांच्यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप नेत्याच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला नसून प्रशासन माजी केंद्रीय मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं प्रियंका यांनी टि्वट करुन म्हटले आहे.
-
मात्र एक साल पहले शाहजहाँपुर के कई प्रशासनिक अधिकारी चिन्मयानंद की आरती उतारते दिखे। मामला अखबारों में उछला था।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बलात्कार पीड़िता द्वारा पूरी आपबीती कहने के बावजूद बलात्कार का मुकदमा दर्ज नहीं हुआ, कैसे होता? जब पूरा महकमा गले लगाकर उनका बचाव कर रहा था।https://t.co/JmG27IjBKG
">मात्र एक साल पहले शाहजहाँपुर के कई प्रशासनिक अधिकारी चिन्मयानंद की आरती उतारते दिखे। मामला अखबारों में उछला था।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 29, 2019
बलात्कार पीड़िता द्वारा पूरी आपबीती कहने के बावजूद बलात्कार का मुकदमा दर्ज नहीं हुआ, कैसे होता? जब पूरा महकमा गले लगाकर उनका बचाव कर रहा था।https://t.co/JmG27IjBKGमात्र एक साल पहले शाहजहाँपुर के कई प्रशासनिक अधिकारी चिन्मयानंद की आरती उतारते दिखे। मामला अखबारों में उछला था।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) September 29, 2019
बलात्कार पीड़िता द्वारा पूरी आपबीती कहने के बावजूद बलात्कार का मुकदमा दर्ज नहीं हुआ, कैसे होता? जब पूरा महकमा गले लगाकर उनका बचाव कर रहा था।https://t.co/JmG27IjBKG
'एका वर्षापुर्वी शहाजहानपूरचे प्रशासकीय अधिकारी चिन्मयानंद यांची आरती करत असल्याचे पाहायला मिळाले होते. हे प्रकरण चांगलेच गाजले होते. तर आता पिडित मुलीने सर्व प्रकरण सांगितल्यानंतर देखील अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यांना वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न सुरु आहे', असे प्रियंका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथील एका विद्यार्थिनीने स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्कार केल्याचा तसंच एक वर्ष लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. मात्र युवतीलाच खंडणीखोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. चिन्मयानंद यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा (कलम ३७६) दाखल झालेला नसून त्याऐवजी आदरस्थानी असल्याच्या गैरफायद्यातून लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याचा (कलम ३७६ क) गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.