तिरुवअनंतपुरम : केरळच्या कासारगोड जिल्ह्यामध्ये झालेल्या एका भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. वऱ्हाडींना घेऊन जाणारी एक खासगी बस पलटल्यामुळे ही दुर्घटना घडली. कर्नाटकमधील सुल्लिया गावावरुन पानाथुरला ही बस जात होती. यामध्ये कर्नाटकातील सुमारे ७० वऱ्हाडी होते. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहितीही समोर आली आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात..
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुत्तुरच्या सुरक्षा एजन्सीची आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही भरधाव बस थेट एका घराला जाऊन धडकली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून, कित्येक जखमी झाले आहेत. काही जणांना किरकोळ दुखापत झाली असून, गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
केरळ-कर्नाटक सीमेजवळ हा अपघात झाला असून, राजापुरम पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा : २१व्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी भरला अर्ज; झाली राज्यातील सर्वात तरुण सरपंच!