नवी दिल्ली - काँग्रेसच्या कार्यकारी समितीकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्यप्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे जाहीरनाम्याच्या अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असणार आहेत.
-
All India Congress Committee constitutes Manifesto Implementation Committees for Rajasthan, Madhya Pradesh, Punjab and Chhattisgarh, for 'proper implementation of party manifesto'. pic.twitter.com/N9IN2woHrz
— ANI (@ANI) January 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">All India Congress Committee constitutes Manifesto Implementation Committees for Rajasthan, Madhya Pradesh, Punjab and Chhattisgarh, for 'proper implementation of party manifesto'. pic.twitter.com/N9IN2woHrz
— ANI (@ANI) January 20, 2020All India Congress Committee constitutes Manifesto Implementation Committees for Rajasthan, Madhya Pradesh, Punjab and Chhattisgarh, for 'proper implementation of party manifesto'. pic.twitter.com/N9IN2woHrz
— ANI (@ANI) January 20, 2020
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात पृथ्वीराज चव्हाणांना स्थान नाकारण्यात आले होते. यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चव्हाणांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे जाहीरनामे लोकांपर्यंत पोहोचावे, तसेच त्याची योग्यरित्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी सोनिया गांधींनी या समितीची स्थापना केली आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाची कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान यांसह पुदुच्चेरीचा समावेश आहे. नागपूरचे काँग्रेस नेते मुकूल वासनिक यांचाही यादीत समावेश आहे. त्यांचा पुदुच्चेरीच्या समन्वय समितीत समावेश करण्यात आला आहे.
विविध राज्यांसाठी नेमण्यात आलेल्या या समित्यांमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.