नवी दिल्ली - 'हिंदी-चीनी, भाई-भाई' असे आपण पहिल्यापासूनच बोलत आलो आहोत. मात्र, तरीही भारत-चीन संबंध पाहता, 'सख्खा भाऊ पक्का वैरी' या म्हणीची प्रचिती येते. हे संबंध सुधारण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न होतात. मात्र, त्यांमध्ये यश येताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे ऑक्टोबरमध्ये भारत भेटीला येणार आहेत. यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग हे यावर्षी आधीच दोन वेळा भेटले आहेत. बिश्केक येथे झालेल्या 'शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या शिखर संमेलनाला आणि ओसाका येथील जी-२० परिषदेला मोदी आणि जिनपिंग यांची भेट झाली होती.
हेही वाचा - Howdy Modi : पंतप्रधान मोदी आठ दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना
काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारत-चीन संबंधांवर परिणाम झाला आहे. भारत-चीन सीमेवरदेखील तणाव आहेच. या मुद्यांवर बसून तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले होते. काश्मीर मुद्यावर चीनने आधी कठोर भूमीका घेत, भारतावर टीका केली होती. मात्र, जयशंकर यांच्या चीन भेटीनंतर चीनने नमते घेत, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला घेण्यावर भर दिली आहे.
हेही वाचा - भारतासोबत युद्ध झाल्यास पाकिस्तान हरू शकतो - इम्रान खान
ऑक्टोबरमधील जिनपिंग यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर, मोदींचा अमेरिका दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. चीनसोबत सुरू असलेल्या टेक-फाईटमध्ये चीनला शह देण्यासाठी ट्रम्प प्रयत्न कतर आहेत. म्हणुन, चीनी कंपनी 'हुवेई'च्या ५-जी चाचणीला मोदींनी हिरवा कंदील देऊ, नये अशी मागणीही डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे केली आहे. तसेच ,भारतदेखील चीन सोडून जपानला जवळ करण्याच्या तयारीत आहे. या सर्व विषयांवर अमेरिकेमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.