नवी दिल्ली - महात्मा गांधींच्या १५०व्या जयंती निमित्त, 'ईटीव्ही भारत'ने बापूंना आदरांजली वाहण्यासाठी मानवतेवर भाष्य करणारे गांधीजींचे लोकप्रिय भजन 'वैष्णव जन तो तेने कहिये' हे खास गीत बनवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी लोक कल्याण मार्ग -7 येथे आयोजित कार्यक्रमात या खास गीताचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. संपूर्ण भारतभरातील कलाकारांनी मिळून हे गीत गायले आहे.
ईटीव्ही भारतच्या व्हिडिओसह पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी यांच्या 150वी जयंती या विषयावर आधारित आणखी तीन व्हिडिओ प्रसिद्ध केले. हे व्हिडिओ राजकुमार हिरानी, तारक मेहता समूह आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केले होते. या कार्यक्रमाला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती.
'वैष्णव जन तो तेने कहिये'...
हेही वाचा - गांधीजी @ १५०: ईटीव्ही भारतने लॉंच केलेल्या विशेष गीताचे पियूष गोयल,व्यंकय्या नायडूंकडून कौतुक
यापूर्वीही या गीताची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्तुती केली आहे. 'ईटीव्ही भारत'चे गाणे रिट्विट करत, या सुंदर गाण्याच्या निर्मितीसाठी ईटीव्ही भारतचे अभिनंदन, असा संदेश त्यांनी लिहला होता. त्यासोबतच केंद्रीय रेल्वे आणि व्यापार मंत्री पियूष गोयल आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही हे गीत स्वतःच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत ईटीव्ही भारतचे कौतुक केले होते.