ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण : उद्या जाहीर होणार दोषींच्या फाशीची नवी तारीख..? - दिल्ली सरकार निर्भया प्रकरण

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना ३ मार्चला फाशी होणार होती. मात्र, दोषी पवनने सोमवारी (२ मार्च) राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. त्यामुळे त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली. मात्र, राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळला आहे.

nirbhaya physical abused case
निर्भया सामूहीक बलात्कार
author img

By

Published : Mar 4, 2020, 2:01 PM IST

Updated : Mar 4, 2020, 5:05 PM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ताची दया याचिका आज राष्ट्रपतींनी फेटाळली. त्यामुळे या चारही दोषींच्या फाशीसाठी नवी तारीख मिळावी, अशी याचिका दिल्ली सरकारने न्यायालयात केली होती. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. राणा यांनी याबाबत दोषींना नोटीस जारी करत, त्यावर उद्यापर्यंत उत्तर मागवले आहे. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी उद्या (गुरूवार) दुपारी दोन वाजता होईल असे स्पष्ट केले.

  • 2012 Delhi gangrape case: Additional Session Judge D Rana issues notice to respondents (convicts) on an application filed by prosecution seeking issuance of fresh death warrant against convicts. Court has sought a response on the application & slated the matter for 2 pm tomorrow. https://t.co/O6rkTmzVIJ

    — ANI (@ANI) March 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवन गुप्ताचा दयेचा अर्ज आज राष्ट्रपतींनी फेटाळला. या आरोपींना ३ मार्चला फाशी होणार होती. मात्र, दोषी पवनने सोमवारी (२ मार्च) राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली. त्यामुळे त्यांची फाशी पुढे ढकलण्यात आली.

निर्भया प्रकरणातील दोषी आपली फाशीची शिक्षा लांबवण्यासाठी रोज नवे पर्याय शोधत आहेत. निर्भया प्रकरणातील चौथा दोषी पवन कुमारने सुधारीत याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळल्यानंतर पवन कुमारने राष्ट्रपतीकडे दया अर्ज दाखल केला होता.

आरोपी पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केल्यामुळे चारही आरोपींची फाशी पुढे ढकलण्यात आली होती. निर्भया प्रकरणातील दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने 17 फेब्रुवारीला ही तारीख जाहीर केली होती. त्यापूर्वी तीन वेळा संबंधित प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

डिसेंबर 2012 मध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मुकेश, पवन गुप्ता, विनय कुमार शर्मा आणि अक्षय ठाकूर या दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंहने यापूर्वी 11 मार्च 2013 मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती.

हेही वाचा : व्हिडिओ : वाघिणीच्या हल्ल्यात युवक ठार; रांची प्राणी संग्रहालयातील प्रकार

Last Updated : Mar 4, 2020, 5:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.