ETV Bharat / bharat

कलम 370 हटविणे काश्मीरींसाठी फायद्याचेच ठरणार  - राष्ट्रपती कोविंद

आज 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशाला संबोधित केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
author img

By

Published : Aug 14, 2019, 8:14 PM IST

Updated : Aug 14, 2019, 8:25 PM IST

नवी दिल्ली - कलम 370 हटविणे काश्मीरींसाठी फायद्याचे ठरणार आहे, असे वक्तव्य देशाोचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रपती कोविंद यांनी आज (बुधवारी) भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित केले आहे. त्यावेळी त्यांनी कलम ३७० सह देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

राष्ट्रपतींनी भाषणाच्या सुरुवातीला देशवासीयांना 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशातील प्रत्येकासाठी उद्याचा दिवस हा आंनदाचा दिवस आहे. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जीवाची बाजी लावलेल्या सैनिक आणि पोलिसांच्या योगदानाचीही कोविंद यांनी यावेळी आठवण करून दिली. तसेच त्यांच्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली.

यावर्षी महात्मा गांधींच्या जन्मास 150 वर्षे पूर्ण होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात त्यांचे प्रेरणादायी योगदान आहे. 2 ऑक्टोबर रोजी आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करू. सरकारकडून कल्याणकारी कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या देशवासीयांचे जीवन अधिक चांगले केले जात आहे. सौरऊर्जेचा वापर वाढविण्यावर विशेष भर देणे हे ही गांधीजींच्या विचारसरणीशीही निगडीत आहे, असे ते म्हणाले.

2019 हे वर्ष गुरू नानक यांच्या 550 व्या जंयतीचे वर्ष आहे. नानक हे देशातील महान संतापैकी एक होते, असे ते म्हणाले. तर राष्ट्रपतींनी नानक यांच्या 550 व्या जयंती निमित्त सर्व भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुका या उन्हाळ्यात पार पडल्या. देशातील नागरिकांनी मतदान करून जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही प्रकियेचा आदर केला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील बैठका यशस्वी झाल्या याचा मला आनंद आहे, असेही ते म्हणाले.

भारत हा नेहमीच 'जगा आणि जगू द्या' या तत्त्वाचे पालन करतो. देशातील नागरिक भाषा, पंथाच्या पुढे जाऊन एकमेकांचा आदर करतात. दरम्यान भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील तरुण क्रीडा क्षेत्रापासून ते विज्ञानापर्यंत कित्येक क्षेत्रात प्रतिभा दाखवत आहे, असेही ते म्हणाले.

मला विश्वास आहे की, समाजातील शेवटच्या माणसाबद्दल आपली संवेदनशीलता कायम राहील. देश आपल्या आदर्शांवर ठाम राहील आणि आपल्या मूल्यांचे पालन करेल, असे कोविंद भाषणाच्या शेवटी म्हणाले.

गेल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देश अनेक प्रलंबित ध्येये गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशा वेळी वादग्रस्त मुद्दे आणि अप्रस्तुत चर्चामुळे स्वत:ला मार्गावरून विचलित होऊ देऊ नका, असे आवाहन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना केले होते.

Intro:Body:

national

Conclusion:
Last Updated : Aug 14, 2019, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.