ETV Bharat / bharat

'फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधानांचा अपमान करत आहेत'; रवी शंकर प्रसादांचे मार्क झुकेरबर्गला पत्र - रविशंकर प्रसाद मार्क झुकेरबर्ग पत्र

फेसबुकमधील काही कर्मचारी हे पंतप्रधान आणि वरिष्ठ कॅबिनेट नेत्यांचा उघड उघड अपमान करतात, आणि तरीही ते कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदांवर अजूनही कार्यरत आहेत हे नक्कीच चुकीचे आहे. या काही लोकांची विचारसरणी ही फेसबुक कंपनीची विचारसरणी म्हणून समोर येते हे कंपनीने लक्षात घ्यायला हवे, असे म्हणणारे पत्र रवीशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्गला पाठवले आहे..

Prasad writes to Zuckerberg, says FB employees abusing PM, ministers
'फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधानांचा अपमान करत आहेत'; रवी शंकर प्रसादांचे मार्क झुकेरबर्गला पत्र
author img

By

Published : Sep 2, 2020, 8:20 AM IST

नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी मंगळवारी फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गला पत्र लिहिले. फेसबुकचे कर्मचारी काही विशिष्ट विचारसरणीच्या लोकांसोबत दुजाभाव करत आहेत. तसेच पंतप्रधान मोदी आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांचा अपमान हे कर्मचारी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

फेसबुकमधील काही कर्मचारी हे पंतप्रधान आणि वरिष्ठ कॅबिनेट नेत्यांचा उघड उघड अपमान करतात, आणि तरीही ते कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदांवर अजूनही कार्यरत आहेत, हे नक्कीच चुकीचे आहे. या काही लोकांची विचारसरणी ही फेसबुक कंपनीची विचारसरणी म्हणून समोर येते हे कंपनीने लक्षात घ्यायला हवे, असेही त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Prasad writes to Zuckerberg, says FB employees abusing PM, ministers
रविशंकर प्रसाद यांचे मार्क झुकेरबर्गला पत्र

यापूर्वी काँग्रेसने आपल्या एका माध्यम अहवालात असे म्हटले होते, की फेसबुकचे एक्झिक्युटिव्ह अंखी दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीमध्ये पाठिंबा दिला होता. याबाबत तपास करुन दोषींना शिक्षा करण्याचे आवाहनही काँग्रेसने केले होते. देशाच्या आंतर्गत राजकारणामध्ये बाहेरच्या कोणत्याही कंपनीला ढवळाढवळ करु देऊ नये, असे राहुल गांधींनी म्हटले होते.

तर, २०१९च्या निवडणुकांवेळी फेसबुकने उजव्या विचारसरणीचे कित्येक फेसबुक पेजेस आणि पोस्ट हटवल्या होत्या, तसेच जाणून बुजून त्यांचे रीच कमी केले होते, असा आरोप रविशंकर यांनी या पत्रातून केला आहे. प्रसाद यांनी कंपनीच्या थर्ड-पार्टी फॅक्ट चेकर्सबाबतही साशंकता व्यक्त केली आहे. खोट्या माहितीच्या तपासणीकरता फेसबुकने ज्या संस्थांना काम दिले आहे, त्यांची विश्वासार्हता किती आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे, संसदेची स्थायी समिती आणि फेसबुकचे अधिकारी यांच्यादरम्यान आज एक बैठक पार पडणार आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण आणि सोशल मीडिया/ऑनलाईन न्यूज प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग याबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. यासाठी समितीने फेसबुकच्या काही अधिकाऱ्यांना समन्स पाठवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.