हरिद्वार - माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या अस्थिंचे हरिद्वार हरकी पडी येथे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी प्रणव मुखर्जी यांचे अस्थिकलश हरिद्वारला पोहोचले. त्यानंतर, प्रणव मुखर्जी यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी पूजा करून अस्थिंचे गंगेत विसर्जन केले.
अस्थिविसर्जनापूर्वी, गंगा सभा प्रमुख प्रदीप झा, सरचिटणीस तन्मय वशिष्ठ आणि सभेपती कृष्णा कुमार शर्मा यांच्या उपस्थितीत एक विधी पार पडला. कॉंग्रेसचे नेते सत्पाल ब्रह्मचारी, संजय अग्रवाल, संजय पालीवाल हेही उपस्थित होते. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यांच्यावर मंगळवारी लोधी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुखर्जींना गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. सोमवारी सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती.