नवी दिल्ली - भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे लष्करी रुग्णालयात निधन झाले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावली होती. आज सकाळी रुग्णालयाने फुफ्फुसांच्या संसर्गामुळे ते सेप्टिक शॉकमध्ये गेले असल्याची माहिती दिली होती. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. पण अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते 84 वर्षांचे होते. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
-
Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020Former President Pranab Mukherjee passes away, announces his son Abhijit Mukherjee. pic.twitter.com/3SFxmRE21j
— ANI (@ANI) August 31, 2020
प्रणव मुखर्जी यांना 10 ऑगस्टला श्वसन संक्रमणामुळे दिल्लीतील लष्कराच्या रेफरल व संशोधन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच उपचारादरम्यान त्यांना कोरोनाचीही लागण झाल्याचे समोर आले होते. यासह त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक सातत्याने लक्ष ठेवून होते. आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत मुखर्जी यांनी वाणिज्यमंत्री, वित्तमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री आणि भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये प्रणव मुखर्जी पहिल्यांदा अर्थमंत्री झाले. 1984 मध्ये युरोमनी मॅगझिनने मुखर्जी यांचा गौरव केला. परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यरत असताना मुखर्जी यांनी अमेरिकेसोबतच्या संबंधामध्ये सुधारणा आणली. भारत अमेरिका अणूकरार 2010 मध्ये दोन्ही देशांनी स्वाक्षरी केल्या.
राष्ट्रपती भवनाचा इतिहास सांगणारे 13 खंड मुखर्जी यांच्या काळात प्रसिद्ध झाले. 11 हजार स्क्वेअर फुट क्षेत्रात दोन संग्रहालयदेखील त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनमध्ये सुरू झाली. यामध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला जातो.
प्रणव मुखर्जी यांना 1997 मध्ये सर्वोत्कृष्ट संसदपट्टू म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2019 मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी प्रणव सर की पाठशाला हा उपक्रम सुरू केला होता.
1957 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी सुव्रा मुखर्जी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आणि एक मुली आहेत. प्रणव मुखर्जी यांच्या पत्नीचे निधन 18 ऑगस्ट 2015 रोजी झाले. मुखर्जी यांना वाचन, बागकाम, संगीत यामध्ये रुची होती. राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्यानंतर ते त्यांचा वेळ प्रणव मुखर्जी फाऊंडेशनसाठी देत होते.
हेही वाचा - प्रणव मुखर्जींबद्दल काय म्हणाल्या होत्या इंदिरा गांधी, जाणून घ्या...
हेही वाचा - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींं यांची अशी होती राजकीय कारकीर्द