ETV Bharat / bharat

भारत, सौदी अरेबिया आर्थिक संबंध उन्नतीकडे...

पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान दोन देशांनी स्वाक्षरी केलेले करार भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील उर्जा संबंध, आतापर्यंत असलेल्या केवळ विक्रेता आणि खरेदीदार समीकरणाच्या पलीकडे जाऊन डावपेचात्मक भागीदारीच्या संपूर्ण नव्या स्तरावर उन्नत करू शकतात.

author img

By

Published : Nov 4, 2019, 2:30 PM IST

भारत सौदी अरेबिया आर्थिक संबंध उन्नतीकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया साम्राज्याला, भारताच्या ऊर्जाविषयक गरजा भागवणारा प्रमुख देश आहे. त्यास आपली दुसरी भेट दिली. पहिला दौरा एप्रिल २०१६ मध्ये झाला होता. गेल्या काही वर्षांपासून दोन देशांतील आर्थिक संबंध प्रगतीपथावर सातत्याने आहेत.

कच्च्या तेलाच्या ८० टक्के गरजांसाठी आयातीवर अवलंबून असलेला देश म्हणून, भारत आपली उर्जा सुरक्षा बळकट करण्यासाठी, स्थिर किमतीवर तेल आयातीच्या विश्वासार्ह स्त्रोतांचा शोध घेत आहे. सौदी अरेबिया या योजनेत अगदी चपखल बसतो. अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या दिशेने निघाला असल्याने, भारत आणि चीन हे दोन देश कच्च्या तेलाचा प्रमुख आयातदार उरले आहेत.

२०१८-१९ मध्ये, सौदी अरेबियाने भारताला ४ कोटी ३३ लाख टन कच्च्या तेलाची विक्री केली. इराकनंतर, सौदी अरेबिया भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. जवळपास १८ टक्के कच्चे तेल त्या देशाकडून आयात केले जाते. अमेरिका आणि चीननंतर तिसरा सर्वात मोठा उर्जा ग्राहक असलेला भारत देश असून, भारत सौदी अरेबियाकडून २ लाख टन एलपीजी किंवा एकूण गरजेच्या ३२ टक्के, कच्चे तेल दर महिन्याला खरेदी करतो.

पंतप्रधान मोदी यांच्या दोन दिवसीय भेटीदरम्यान दोन देशांनी स्वाक्षरी केलेले करार भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील उर्जा संबंध, आतापर्यंत असलेल्या केवळ विक्रेता आणि खरेदीदार समीकरणाच्या पलीकडे जाऊन डावपेचात्मक भागीदारीच्या संपूर्ण नव्या स्तरावर उन्नत करू शकतात. यापैकी इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम लि. आणि सौदी आरामको यांच्यातील प्रारंभिक कराराचा परिणाम लवकरच होणाऱ्या कर्नाटकातील पदूर येथील दुसऱ्या तेल साठा सुविधेत सौदी प्रमुख भूमिका निभावण्यात होणार आहे.

गेल्या वर्षी विशाखापट्टनम (१.३३एमएमटी), मंगळूरू(१.५एमएमटी) आणि पदूर(२.५एमएमटी) या ठिकाणी तेल साठे तयार उभारण्याच्या योजनेच्या अतिरिक्त नवी दिल्लीने ओदिशातील चांदीखोल आणि पदूर येथे ६.५ दशलक्ष मेट्रिक टन डावपेचात्मक पेट्रोलसाठे सुविधा उभारण्यास मंजुरी दिली आहे. दुसरा करार इंडिअन ओईल कॉर्पोरेशन लि. च्या पश्चिम आशिया युनिट आणि सौदी अरेबियाची अल जेरी कंपनी यांच्यात झाला असून डाऊनस्ट्रीम सेक्टरमध्ये सहकार्यासाठी तो होता तसेच यात सौदी साम्राज्यात तेल केंद्रे स्थापन करण्याचाही समावेश आहे. तेल आणि वायू प्रकल्पांच्या भारताच्या मूल्य साखळीत तेल पुरवठा, मार्केटिंग, पेट्रोकेमिकलमध्ये शुद्धीकरण आणि वंगण यात गुंतवणुकीमुळे दोन देशांत उर्जा सहकार्य आणखी वाढणार आहे.

सौदी अरेबियाची राष्ट्रीय तेल कंपनी, आरामको, आणि संयुक्त अरब अमिरातीची राष्ट्रीय तेल कंपनी अबू धाबी राष्ट्रीय तेल कंपनी(एडीएनओसी), यांनी भारताच्या सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण कंपन्याच्या संघाशी त्रिपक्षीय करार करून महाराष्ट्रातील पश्चिम किनाऱ्यावर १० लक्ष २० हजार पिंप प्रती दिन क्षमतेच्या रायगडमधील नियोजित तेल शुद्धीकरण कारखान्यात ५० टक्के भांडवल गुंतवण्याचे ठरवले आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा हरितक्षेत्र तेल शुद्धीकरणकारखाना असेल.

१४ सप्टेंबरला सौदी आरामको तेल कारखान्यावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ल्यांची मालिका होऊनही सौदी गुंतवणुकीबाबत दिलेल्या वचनांचे पालन करत असून त्या हल्ल्यामुळे खरेतर सौदीचे दररोजच्या उत्पादनात तोटा येत असून जागतिक तेल बाजारात गंभीर व्यत्यय आला आहे. रिलायंस इंडस्ट्रीज लि. आणि आरामको यांच्यातील प्रस्तावित भागीदारीमध्ये वाढत्या उर्जा संबंधांचे डावपेचात्मक स्वरूप प्रतिबिंबित झाले आहे.

दोन देशांतील तेल आणि बिगर तेल व्यापार २०१७-१८ मध्ये २७.४८ अब्ज डॉलर इतका असून सौदी अरेबियाला भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनवले आहे. आर्थिक संबंधांचे बिगर तेल आयामही मजबूत आहे. साम्राज्यातील सर्वात मोठी प्रवाशांची संख्या भारतीयांची असून २० लाख ६० हजार इतक्या संख्येने असलेले भारतीय लोक दरवर्षी अंदाजे १८ अब्ज डॉलर इतकी रक्कम भारतात परत पाठवतात. कामगारांशिवाय भांडवली ओघासाठी संधीही प्रचंड आहे. आकर्षक परताव्याच्या शोधात असलेल्या प्रदेशातील संपत्ती फंड आणि पेट्रो डॉलरसाठी, भारत ही वाढ आणि म्हणून परतावा देणारी प्रमुख उभरती बाजारपेठ असून फार थोड्या अर्थव्यवस्था तिची बरोबरी करू शकतात. जगातील सर्वातील श्रीमंत सार्वभौम निधी, पब्लिक इनव्हेस्टमेंट फंड, हा सौदी अरेबियाचा प्राथमिक उद्यमी वाहन आहे. आपल्या नुकत्याच संपवलेल्या भेटीदरम्यान, वाळवंटातील दाव्होस म्हणून नावदिलेल्या फ्युचर इनव्हेस्टमेंट इनिशीएटिव्ह मंचावर पंतप्रधान मोदी यांनी प्रमुख भाषण केले.

सप्टेंबरमध्ये सौदी अरेबियाने भारतात उर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, पायाभूत सुविधा, कृषी, खनिजे आणि खाणी या सर्व क्षेत्रांत १०० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती. संयुक्त सहकार्य आणि गुंतवणुकीसाठी ४० हून अधिक संधी निश्चित करण्यात आल्या होत्या.

लेखक - पूजा मेहरा

Intro:Body:

ि

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.