ETV Bharat / bharat

हवेतील सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रदूषण भारताला ढकलतेय धोकादायक स्थितीत

author img

By

Published : Nov 16, 2019, 5:02 PM IST

हवेतील प्राणघातक प्रदूषणकारी कणांचे भांडवल असलेला देश म्हणून भारताची संदिग्ध विशेषता आहे, जी त्याच्या पीएम २०५ चे उत्सर्जन करणारा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश या क्रमवारीत प्रतिबिंबित झाले आहे. २०१८ मध्ये, भारतात हवेतील पीएम २.५ चे सरासरी प्रमाण ७२.५ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा) असे होते, जे की डब्ल्यूएचओने १० मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा इतके असावे, अशी शिफारस केली आहे. बांगलादेशने सर्वोच्च म्हणजे ९७.१ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा असे प्रमाण नोंदवले आहे तर ७४.३ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा यासह पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे.

हवेतील सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रदूषण भारताला ढकलतेय धोकादायक स्थितीत

नवी दिल्ली - भारतातील बहुतांश लोकसंख्या-किमान अपवादासह-हवेतून श्वासात जाणाऱ्या धोकादायक सूक्ष्म प्रदूषणकारी कणांच्या (पीएम) संपर्कात असून या कणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा सहा ते सात पट जास्त आहे. हे प्रदूषणकारी कण दोन स्रोतांमधून निर्माण होतात-घन रूपातील इंधन वापरल्याने निर्माण होणारे कुटुंबातील अथवा देशांतर्गत सूक्ष्म कण आणि बाहेरच्या किंवा सभोवतालच्या वातावरणातून निर्माण झालेले कण हे धूळ, काजळी आणि उद्योगांतून बाहेर टाकल्या जाणाऱ्या रसायनांमुळे तसेच बांधकाम साईट, वाहने, कोळसा ज्वलनावर आधारित उर्जा प्रकल्प, बायोमास आणि शेतीतील वाया गेलेले आणि अवशेष यांच्या ज्वलनातून निर्माण होणारे कण असतात. हवेतील प्रदूषणकारी कणांची वर्गवारी त्यांचा आकार किंवा व्यास यावर आधारित पीएम २.५ आणि पीएम १० अशी केली आहे. हवेतील कणांचा आकार जर २.५ मायक्रोन असेल तर पीएम २.५ आणि १० पेक्षा कमी असेल तर पीएम १० असे म्हणण्यात येते.

हेही वाचा - breaking अयोध्या निकाल : मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्याचिका दाखल करणार

हवाई दर्जा निर्देशांकानुसार (एक्यूआय) निकषानुसार, ५५.५ ते १५० .४ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा या श्रेणीमधील पीएमची (हवेतील कण) धोकादायक म्हणून वर्गवारी केली असून या वर्गातील लोकसंख्या ही विपरीत परिणामांची वाढती शक्यता आणि हृदय आणि फुफ्फुसांमध्ये बिघाड होणे या परिणामांसाठी प्रवण असते. या निकषांनुसार गेले तर, भारताच्या अनेक भागांत, ज्यात पीएम २.५चे हवेतील प्रमाण ७२ ते १३५ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा असल्याने हे भाग धोकादायक विभागात मोडतात.

देशातील हवेचा दर्जा ढासळत चालल्यामागे, प्रदूषणकारी उद्योगांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी देखरेख तसेच परिणामकारक आणि कडक नियमनाची वानवा आणि प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी तसेच पर्यावरण दूषित होण्यावर आळां घालण्यासाठी संबंधित अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे असलेली कल्पनां आणि धोरणे यांची कमतरता यांचा प्रमुख कारणांमध्ये समावेश आहे. भारतात हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण अनिष्ट पातळीवर गेले असून आता ते परत कमी होण्याच्या स्थितीत नाही.

हे सिद्ध करण्यासाठी येथे काही कटु सत्य दिली आहेत. २०१८ मध्ये , २५ भारतीय शहरे ही जगातील ५० सर्वात जास्त खराब प्रदूषणकारी शहरांमध्ये होती आणि गुरूग्राम आणि गाझियाबाद- पहिल्या आणि दुसरय स्थानावर असून- त्यांनी सरासरी वार्षिक पीएम २.५ चे हवेतील प्रमाण १३५ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा इतके नोंदवले आहे,जे सामान्य श्रेणीपेक्षा २० पटींनी जास्त आहे. नेहमी चर्चेत असलेली राजधानी दिल्ली वार्षिक सरासरी ११३ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा सह ११ व्या स्थानी होती. ही सर्व शहरे धोकादायक विभागात होती आणि त्यांनी वर्षभरात अत्यंत धोकादायक पातळीही नोंदवली आहे. हवेतील प्रदूषणकारी कणांचे इतके धोकादायक उच्च प्रमाण अत्यंत दुर्बल आणि आरोग्याला प्राणघातक धोका असल्यचे दुश्चीन्ह असणार, हे अटळ आहे.

हेही वाचा - दिल्लीतील प्रदूषणाला शेतकरी जबाबदार नाही, शेतजमीन जाळल्याने होताहेत आरोप

जागतिक हवेची स्थिती या नावाने आरोग्य साचा आणि मूल्यांकन संस्थेने आरोग्य परिणाम संस्थेच्या सहकार्याने या वर्षी प्रसिद्ध केलेल्या विशेष अहवालात, २०१७ मध्ये हवेतील प्रदूषण हे सातत्याने जगभरात म्रृत्यू आणि अपंगत्वाचे पहिल्या पाच जोखमीच्या घटकांमध्ये स्थान राखून आहे, याकडे निर्देश केला आहे. कुपोषण, दारूचे अतिसेवन आणि शारीरिक हालचाल थंड पडणे या अनेक आणि चांगल्या परिचित असलेल्या जोखमीच्या घटकापेक्षा हा घटक कित्येक मृत्यूना जास्त जबाबदार आहे. दरवर्षी, रस्त्यावरील अपघातात जखमी होणे किंवा मलेरिया यांच्यापेक्षा हवेतील प्रदूषणसंबंधी आजारांनी अधिक लोक मरतात.

पीएम २.५ फुफ्फुसात आतापर्यंत घुसतात, आतील वायुकोषीय भिंती नष्ट करतात आणि परिणामी फुफ्फुसे निकामी करतात. अतिसूक्ष्म आकार असल्याने या कणांना फुफ्फुसाच्या पृष्ठभागावरील थर आणि फुफ्फुस आणि रक्त यांच्यातील अडथळा पार करून जाणे शक्य होते. पीएम २.५ श्वासावाटे आत ओढून घेणे हे अशा तर्हेने हृदयविकार, जुनाट श्वसनाचे विकार, फुफ्फुसात संसंर्ग आणि कर्करोग यांचे जोरदार कारक बनते. २०१७ मध्ये जागतिक स्तरावर हवेतील प्रदूषण हा पाचवा सर्वोच्च मृत्यूची जोखीम असलेला घटक होता, असे या अहवालात निर्देशित करण्यात आले असून ४० लाख ९० हजार मृत्यू आणि १४ कोटी ७० लाख लोकांचे आरोग्यसंपन्न आयुष्य नष्ट झाले.

जागतिक आरोग्य संघटनेने -घरगुती आणि बाहेरच्या स्त्रोतांपासून होणारे - हवेतील प्रदूषण हे संसर्गजन्य नसलेल्या रोगांसाठी महत्वाचा जोखमीचा घटक आहे, अशी वर्गवारी केली असून हृदयविकारामुळे अंदाजे २४ टक्के, २५ टक्के हृदयविकाराचा झटका, ४३ टक्के जुनाट प्रतिरोधी फुफ्फुसाच्या विकाराने आणि २९ टक्के फुफ्फुसांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

बाहेरच्या प्रदूषणकारी कणांशी संपर्क येण्याचे प्रमाण वाढत असल्याने भारतावर कुपोषणानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जोखमीचा घटक असलेले हवेतील प्रदूषण आणि त्यातून होणार्या मोठ्या प्रमाणावरील आजारांचा बोजा वाढत आहे. २०१७ मध्ये, सभोवतालच्या वातावरणातील आणि घरगुती कण प्रदूषणामुळे दहा लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला, असे वृत्त आहे. प्रदूषणकारी कणांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणावर आल्याने त्याचा हानिकारक परिणाम आणि त्याच्या परिणामस्वरूप भारतीय लोकसंख्येच्या हृदयसंबंधी आणि श्वसनाच्या विकारांना बळी पडण्याच्या प्रवणतेचे प्रतिबिंब आयएचएमईने केलेल्या व्यापक संशोधनात पडले आहे.

या निकालांचे विश्लेषण केल्यानंतर असे संकेत मिळतात, की भारतात या आजारांच्या घटनाचा संबंध बाहेरच्या आणि घरगुती प्रदूषणकारी कणांच्याशी लावला गेला आहे. भारतीय लोकांच्या प्रदूषणकारी कणांच्या ग्रहणक्षमतेचा जोखमीच दर हवेतील प्रदूषणकारी कणांच्या उच्च प्रमाणाशी लोकांचा किती संपर्क येतो, यास प्रतिबिंबित करतो. देशातील सर्व कारणांमुळे झालेले सुमारे १२ टक्के मृत्यूचा संबंध प्रदूषणकारी कणांशी लावला गेला असून यात ७ टक्के आणि ५ टक्के मृत्यू अनुक्रमे घन इंधनाचे ज्वलन केल्याने बाहेरच्या आणि घरगुती कणांमुळे झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत हा दर कायम स्थिर आहे, ज्यावरून हे सूचित होते की, प्रदूषणकारी कणांचे प्रमाण हे ग्रहणक्षमतेचा जोखमीचा स्तर आहे.

भारतातील श्वसनातील संसर्गान्पैकी ४७ टक्के संसर्गांचा संबंध पीएम २.५ शी लावला गेला असून त्यापैकी घन इंधनांतून निर्माण झालेल्या बाह्य आणि घरगुती प्रदूषणकारी कणांचे प्रमाण अनुक्रमे २६ आणि २१ टक्के आहे. हृदयासंबंधी विकाराशी संबंधित आजार होण्याचा दराच्या दृष्टीकोनातून, भारतात एकूण २२.१७ टक्के हृदयविकार प्रकरणांपैकी, १३.८८ टक्के बाह्य प्रदूषणकारी कणांमुळे आणि ८.२९टक्के घरगुती प्रदूषणकारी कणांमुळे होते. घन इंधनांमुळे जुनाट प्रतिरोधी फुफ्फुसाच्या विकारापैकी २२.४८ टक्के बाह्य प्रदूषणकारी कणांमुळे तर १७.६२ टक्के घरगुती प्रदूषणकारी कणांमुळे होते.

विश्लेषणातून एक महत्वाची गोष्ट उघडकीस येते ती म्हणजे, प्रदूषणाचा स्तर कमी करण्यावर नियंत्रण आणि प्रतिबंधक उपायांचा काहीच अथवा फारच थोडा परिणाम झाला आहे. या उलट, अनेक प्रकरणांमध्ये, प्रदूषणाची पातळी वाढत आहे. या बाबतीत अत्यंत चपखल उदाहरण म्हणजे दिल्लीचे देता येईल, जेथे सर्व वाहनांमध्ये सीएनजी आणि उत्प्रेरक परिवर्तक बसवण्याचे वायू उत्सर्जनाचे उपाय योजल्यानंतरही प्रदूषण स्तर धोकादायक आणि अतिधोकादायक राहिला आहे. केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशभरातसुद्धा, उत्सर्जनमुक्त अशा बीएस चार वाहने रस्त्यात उतरवण्याचा उपायही प्रदूषणाचा स्तर लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी परिणामकारक सिद्ध होऊ शकलेला नाही. कार्बनच्या रुपात विष बाहेर टाकणाऱ्या वाहनांची संख्या बीएसचार वाहनांपेक्षा जास्त असणे, हेच बहुतेक हवेतील प्रदूषण जैसे थे किंवा उच्च असण्याचे कारण असू शकते.

प्रदूषण कमी करण्याचे उपायांमध्ये मोठा अडथळा हा नियमांचे पालन न करणारे उद्योग क्षेत्र आहे. बहुतेक औद्योगिक व्यवस्थापन दंड भरून उत्सर्जन नियमनाचा भंग बिनधास्त करतात. प्रदूषण प्रतिबंधक उपकरणे बसवण्यास त्यांचा विरोध त्यांचे कार्यचालन आणि व्यवस्थापन यात लागणारा जास्तीचा पैसा यासाठी असतो. या सर्व घटकांच्या परिप्रेक्ष्यातून, मोठा प्रश्न हा आहे की: पसरणाऱ्या प्रदूषणकारी कणांमुळे दूषित हवेशी संवेदनशीलतेच्या धोक्यासह जगणे हीच आमची नियती आहे काय? की, प्रदूषण उच्चवरून कमीवर आणण्यासाठी काही उपाय आहेत?

प्रदूषणाच्या स्तरावर देखरेख ठेवून सातत्याने त्यावर नजर ठेवणे हा एक उपायाचा भाग झाला. जे उद्योग नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना शिक्षा करणे, कोळशावर चालणार्या उर्जा प्रकल्पात अगदी आधुनिक फ्ल्यू गॅस तंत्रज्ञान वापरणे, जुनी वाहने टप्प्याटप्प्याने बाद करणे हे उपाय केले असते तर आजपर्यंत प्रदूषणकारी कणांमुळे होणारे प्रदूषण लक्षणीय प्रमाणात कमी झाले असते. सर्वात महत्वाचे म्हणजे, संबंधित नियामक अधिकाऱ्यांना केवळ तंत्रज्ञानाने सुसज्ज करून नव्हे तर हे उद्दिष्ट कसे साध्य करायचे, याचे ज्ञानही हवे. ज्या देशांनी आपल्या देशातील हवेचा दर्जा श्वास घेण्याजोगा पर्यंत सुसह्य केला आहे, त्यांच्याकडून उपायांचे अनुकरण करतील.

- सत्यपाल मेनन

Intro:Body:

हवेतील सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रदूषण भारताला ढकलतेय धोकादायक स्थितीत

नवी दिल्ली - भारतातील बहुतांश लोकसंख्या-किमान अपवादासह-हवेतून श्वासात जाणार्या धोकादायक सूक्ष्म प्रदूषणकारी कणांच्या (पीएम) संपर्कात असून या कणांचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) निश्चित केलेल्या प्रमाणापेक्षा सहा ते सात पट जास्त आहे. हे प्रदूषणकारी कण दोन स्त्रोतांमधून निर्माण होतात-घन रूपातील इंधन वापरल्याने निर्माण होणारे कुटुंबातील अथवा देशांतर्गत सूक्ष्म कण आणि बाहेरच्या किंवा सभोवतालच्या वातावरणातून निर्माण झालेले कण हे धूळ, काजळी आणि उद्योगांतून बाहेर टाकल्या जाणार्या रसायनांमुळे तसेच बांधकाम साईट, वाहने, कोळसा ज्वलनावर आधारित उर्जा प्रकल्प, बायोमास आणि शेतीतील वाया गेलेले आणि अवशेष यांच्या ज्वलनातून निर्माण होणारे कण असतात. हवेतील प्रदूषणकारी कणांची वर्गवारी त्यांचा आकार किंवा व्यास यावर आधारित पीएम २.५ आणि पीएम १० अशी केली आहे. हवेतील कणांचा आकार जर २.५ मायक्रोन असेल तर पीएम २.५ आणि १० पेक्षा कमी असेल तर पीएम १० असे म्हणण्यात येते. 

हवेतील प्राणघातक प्रदूषणकारी कणांचे भांडवल असलेला देश म्हणून भारताची संदिग्ध विशेषता आहे, जी त्याच्या पीएम २०५ चे उत्सर्जन करणारा जगातील तिसर्या क्रमांकाचा देश या क्रमवारीत प्रतिबिंबित झाली आहे. २०१८ मध्ये, भारतात हवेतील पीएम २.५ चे सरासरी प्रमाण ७२.५ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा) असे होते, जे की डब्ल्यूएचओने १० मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा इतके असावे, अशी शिफारस केली आहे. बांगलादेशने सर्वोच्च म्हणजे ९७.१ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा असे प्रमाण नोंदवले आहे तर ७४.३ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा यासह पाकिस्तान दुसर्या स्थानावर आहे. 

हवाई दर्जा निर्देशांकानुसार (एक्यूआय) निकषानुसार, ५५.५ ते १५० .४ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा या श्रेणीमधील पीएमची (हवेतील कण) धोकादायक म्हणून वर्गवारी केली असून या वर्गातील लोकसंख्या ही विपरीत परिणामांची वाढती शक्यता आणि हृदय आणि फुफ्फुसांमध्ये बिघाड होणे या परिणामांसाठी प्रवण असते. या निकषांनुसार गेले तर, भारताच्या अनेक भागांत, ज्यात पीएम २.५चे हवेतील प्रमाण ७२ ते १३५ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा असल्याने हे भाग धोकादायक विभागात मोडतात.   

देशातील हवेचा दर्जा ढासळत चालल्यामागे, प्रदूषणकारी उद्योगांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी देखरेख तसेच परिणामकारक आणि कडक नियमनाची वानवा आणि प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी तसेच पर्यावरण दूषित होण्यावर आळां घालण्यासाठी संबंधित अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे असलेली कल्पनां आणि धोरणे यांची कमतरता यांचा प्रमुख कारणांमध्ये समावेश आहे. भारतात हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण अनिष्ट पातळीवर गेले असून आता ते परत कमी होण्याच्या स्थितीत नाही.

हे सिद्ध करण्यासाठी येथे काही कटु सत्य दिली आहेत. २०१८ मध्ये , २५ भारतीय शहरे ही जगातील ५० सर्वात जास्त खराब प्रदूषणकारी शहरांमध्ये होती आणि गुरूग्राम आणि गाझियाबाद- पहिल्या आणि दुसरय स्थानावर असून- त्यांनी सरासरी वार्षिक पीएम २.५ चे हवेतील प्रमाण १३५ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा इतके नोंदवले आहे,जे सामान्य श्रेणीपेक्षा २० पटींनी जास्त आहे. नेहमी चर्चेत असलेली राजधानी  दिल्ली वार्षिक सरासरी ११३ मायक्रोग्राम्स प्रती घनमीटर हवा सह ११ व्या स्थानी होती. ही सर्व शहरे धोकादायक विभागात होती आणि त्यांनी वर्षभरात अत्यंत धोकादायक पातळीही नोंदवली आहे. हवेतील प्रदूषणकारी कणांचे इतके धोकादायक उच्च प्रमाण अत्यंत दुर्बल आणि आरोग्याला प्राणघातक धोका असल्यचे दुश्चीन्ह असणार, हे अटळ आहे.

जागतिक हवेची स्थिती या नावाने आरोग्य साचा आणि मूल्यांकन संस्थेने आरोग्य परिणाम संस्थेच्या सहकार्याने या वर्षी प्रसिद्ध केलेल्या विशेष अहवालात, २०१७ मध्ये हवेतील प्रदूषण हे सातत्याने जगभरात म्रृत्यू आणि अपंगत्वाचे पहिल्या पाच जोखमीच्या घटकांमध्ये स्थान राखून आहे, याकडे निर्देश केला आहे. 

कुपोषण, दारूचे अतिसेवन आणि शारीरिक हालचाल थंड पडणे या अनेक आणि चांगल्या परिचित असलेल्या जोखमीच्या घटकापेक्षा हा घटक कित्येक मृत्यूना जास्त जबाबदार आहे. दरवर्षी, रस्त्यावरील अपघातात जखमी होणे किंवा मलेरिया यांच्यापेक्षा हवेतील प्रदूषणसंबंधी आजारांनी अधिक लोक मरतात. 

पीएम २.५ फुफ्फुसात आतापर्यंत घुसतात, आतील वायुकोषीय भिंती नष्ट करतात आणि परिणामी फुफ्फुसे निकामी करतात. अतिसूक्ष्म आकार असल्याने या कणांना फुफ्फुसाच्या पृष्ठभागावरील थर आणि फुफ्फुस आणि रक्त यांच्यातील अडथळा पार करून जाणे शक्य होते. पीएम २.५ श्वासावाटे आत ओढून घेणे हे अशा तर्हेने हृदयविकार, जुनाट श्वसनाचे विकार, फुफ्फुसात संसंर्ग आणि कर्करोग यांचे जोरदार कारक बनते. २०१७ मध्ये जागतिक स्तरावर हवेतील प्रदूषण हा पाचवा सर्वोच्च मृत्यूची जोखीम असलेला घटक होता, असे या अहवालात निर्देशित करण्यात आले असून ४० लाख ९० हजार मृत्यू आणि १४ कोटी ७० लाख लोकांचे आरोग्यसंपन्न आयुष्य नष्ट झाले.

जागतिक आरोग्य संघटनेने -घरगुती आणि बाहेरच्या स्त्रोतांपासून होणारे - हवेतील प्रदूषण हे संसर्गजन्य नसलेल्या रोगांसाठी महत्वाचा जोखमीचा घटक आहे, अशी वर्गवारी केली असून हृदयविकारामुळे अंदाजे २४ टक्के, २५ टक्के हृदयविकाराचा झटका, ४३ टक्के जुनाट प्रतिरोधी फुफ्फुसाच्या विकाराने  आणि २९ टक्के फुफ्फुसांच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. 

बाहेरच्या प्रदूषणकारी कणांशी संपर्क येण्याचे  प्रमाण वाढत असल्याने भारतावर कुपोषणानंतर दुसर्या क्रमांकाचा जोखमीचा  घटक असलेले हवेतील प्रदूषण आणि त्यातून होणार्या मोठ्या प्रमाणावरील  आजारांचा बोजा वाढत आहे. २०१७ मध्ये, सभोवतालच्या वातावरणातील आणि घरगुती कण प्रदूषणामुळे  दहा लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला, असे वृत्त आहे. प्रदूषणकारी कणांच्या संपर्कात मोठ्या प्रमाणावर आल्याने त्याचा हानिकारक परिणाम आणि त्याच्या परिणामस्वरूप भारतीय लोकसंख्येच्या हृदयसंबंधी आणि श्वसनाच्या विकारांना बळी पडण्याच्या  प्रवणतेचे प्रतिबिंब आयएचएमईने केलेल्या व्यापक संशोधनात पडले आहे. 

या निकालांचे विश्लेषण केल्यानंतर असे संकेत मिळतात की, भारतात या आजारांच्या घटनाचा संबंध  बाहेरच्या आणि घरगुती प्रदूषणकारी कणांच्याशी लावला गेला आहे. भारतीय लोकांच्या प्रदूषणकारी कणांच्या ग्रहणक्षमतेचा जोखमीच दर हवेतील प्रदूषणकारी कणांच्या उच्च प्रमाणाशी लोकांचा किती संपर्क येतो, यास प्रतिबिंबित करतो. देशातील सर्व कारणांमुळे झालेले सुमारे १२ टक्के मृत्यूचा संबंध प्रदूषणकारी कणांशी लावला गेला असून यात ७ टक्के आणि ५ टक्के मृत्यू अनुक्रमे घन इंधनाचे ज्वलन केल्याने बाहेरच्या आणि घरगुती कणांमुळे झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत हा दर कायम स्थिर आहे, ज्यावरून हे सूचित होते की, प्रदूषणकारी कणांचे प्रमाण हे ग्रहणक्षमतेचा जोखमीचा स्तर आहे. 

भारतातील श्वसनातील संसर्गान्पैकी ४७ टक्के संसर्गांचा संबंध पीएम २.५ शी लावला गेला असून त्यापैकी घन इंधनांतून निर्माण झालेल्या बाह्य आणि घरगुती  प्रदूषणकारी कणांचे प्रमाण अनुक्रमे २६ आणि २१ टक्के आहे. हृदयासंबंधी विकाराशी संबंधित आजार होण्याचा दराच्या दृष्टीकोनातून,  भारतात एकूण २२.१७ टक्के हृदयविकार प्रकरणांपैकी, १३.८८ टक्के बाह्य प्रदूषणकारी कणांमुळे आणि ८.२९टक्के घरगुती प्रदूषणकारी कणांमुळे होते. घन इंधनांमुळे जुनाट प्रतिरोधी फुफ्फुसाच्या विकारापैकी २२.४८ टक्के बाह्य प्रदूषणकारी कणांमुळे तर १७.६२ टक्के घरगुती प्रदूषणकारी कणांमुळे होते.

विश्लेषणातून एक महत्वाची गोष्ट उघडकीस येते ती म्हणजे, प्रदूषणाचा स्तर कमी करण्यावर नियंत्रण आणि प्रतिबंधक उपायांचा काहीच अथवा फारच थोडा परिणाम झाला आहे. या उलट, अनेक प्रकरणांमध्ये, प्रदूषणाची पातळी वाढत आहे. या बाबतीत अत्यंत चपखल उदाहरण म्हणजे दिल्लीचे देता येईल, जेथे सर्व वाहनांमध्ये सीएनजी आणि उत्प्रेरक  परिवर्तक बसवण्याचे वायू उत्सर्जनाचे उपाय योजल्यानंतरही प्रदूषण स्तर धोकादायक आणि अतिधोकादायक राहिला आहे. केवळ दिल्लीतच नव्हे, तर देशभरातसुद्धा, उत्सर्जनमुक्त अशा बीएस चार वाहने रस्त्यात उतरवण्याचा उपायही प्रदूषणाचा स्तर लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी परिणामकारक सिद्ध होऊ शकलेला नाही. कार्बनच्या रुपात विष बाहेर टाकणाऱ्या वाहनांची संख्या बीएसचार वाहनांपेक्षा जास्त असणे, हेच बहुतेक हवेतील प्रदूषण जैसे थे किंवा उच्च असण्याचे कारण असू शकते. 

प्रदूषण कमी करण्याचे उपायांमध्ये मोठा अडथळा हा नियमांचे पालन न करणारे उद्योग क्षेत्र आहे. बहुतेक औद्योगिक व्यवस्थापन दंड भरून उत्सर्जन नियमनाचा भंग बिनधास्त करतात. प्रदूषण प्रतिबंधक उपकरणे बसवण्यास त्यांचा विरोध त्यांचे कार्यचालन आणि व्यवस्थापन यात लागणारा जास्तीचा पैसा यासाठी असतो.

या सर्व घटकांच्या परिप्रेक्ष्यातून, मोठा प्रश्न हा आहे की: पसरणाऱ्या प्रदूषणकारी कणांमुळे दूषित हवेशी संवेदनशीलतेच्या धोक्यासह जगणे हीच आमची नियती आहे काय? की, प्रदूषण उच्चवरून कमीवर आणण्यासाठी काही उपाय आहेत?

प्रदूषणाच्या स्तरावर देखरेख ठेवून सातत्याने त्यावर नजर ठेवणे हा एक उपायाचा भाग झाला. जे उद्योग नियमांचे पालन करत नाहीत, त्यांना शिक्षा करणे, कोळशावर चालणार्या उर्जा प्रकल्पात अगदी आधुनिक फ्ल्यू गॅस तंत्रज्ञान वापरणे, जुनी वाहने टप्प्याटप्प्याने बाद करणे हे उपाय केले असते तर आजपर्यंत प्रदूषणकारी कणांमुळे  होणारे प्रदूषण लक्षणीय प्रमाणात कमी झाले असते. सर्वात महत्वाचे म्हणजे, संबंधित नियामक अधिकाऱ्यांना केवळ तंत्रज्ञानाने सुसज्ज करून नव्हे तर हे उद्दिष्ट कसे साध्य करायचे, याचे ज्ञानही हवे. ज्या देशांनी आपल्या देशातील हवेचा दर्जा श्वास घेण्याजोगा पर्यंत सुसह्य केला आहे, त्यांच्याकडून उपायांचे अनुकरण करतील. 

- सत्यपाल मेनन 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.