सासाराम - बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबण्याच्या काही तास अगोदर महागटबंधनचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांनी जातीय पत्ते खेळले आहेत. डेहरी येथील सभेत त्यांनी म्हटले, की नितीशकुमारांच्या राज्यात लोकप्रतिनिधी आणि सर्व सामान्य माणसांना काही किंमत नाही. लालूंच्या राज्यात गरीब साहेबांसमोर ताठ मानाने उभारु शकत असत.
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार तेजस्वी यादव खुपच वेगाने करत आहेत. रोहतास जिल्ह्यातील डिहरी विधानसभा मतदारसंघातील सभेत त्यांच्या जातीय समीकरणे जोडण्याच्या वक्तव्यावरुन सत्ताधारी जनता दल यूनायटेडने त्यांना अडचणीत आणले आहे. तसेच त्यांना मताच्या ध्रुवीकरणासाठी जातीय पत्ते खेळल्याचा आरोप केला आहे.
नितीशकुमारांच्या राज्यात रोजगार निर्मिती नाही
या सभेत ते म्हणाले होते, की 'लालू प्रसाद यादव यांच्या सरकार वेळी गरीब ताठ मानाने प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर चालत असत. जो कर्मचारी काम करेल त्याचा सन्मान केला जात असे. जो वाईट काम करेल त्याला शिक्षा मिळायची. 15 वर्षात नितीश कुमार यांनी रोजगार दिला नाही. एक ही कारखाना सुरू केला नाही, गरीबी संपवली नाही, तो पुढीक 5 वर्षात काय करणार'
-
लालू जी के शासन में गरीब सीना तान के बाबू साहब के सामने चलते थे, जो कर्मचारी काम करेगा उसे सम्मान मिलेगा, जो गलत काम करेगा उसे सजा मिलेगी।... 15 साल जो व्यक्ति (नीतीश कुमार) रोज़गार नहीं दिया, कारखाना नहीं लगाया, गरीबी नहीं हटाया वो अगले 5 साल क्या करेगा : तेजस्वी यादव, राजद pic.twitter.com/DJfBPOOfFI
— ANI_HindiNews (@AHindinews) October 26, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">लालू जी के शासन में गरीब सीना तान के बाबू साहब के सामने चलते थे, जो कर्मचारी काम करेगा उसे सम्मान मिलेगा, जो गलत काम करेगा उसे सजा मिलेगी।... 15 साल जो व्यक्ति (नीतीश कुमार) रोज़गार नहीं दिया, कारखाना नहीं लगाया, गरीबी नहीं हटाया वो अगले 5 साल क्या करेगा : तेजस्वी यादव, राजद pic.twitter.com/DJfBPOOfFI
— ANI_HindiNews (@AHindinews) October 26, 2020लालू जी के शासन में गरीब सीना तान के बाबू साहब के सामने चलते थे, जो कर्मचारी काम करेगा उसे सम्मान मिलेगा, जो गलत काम करेगा उसे सजा मिलेगी।... 15 साल जो व्यक्ति (नीतीश कुमार) रोज़गार नहीं दिया, कारखाना नहीं लगाया, गरीबी नहीं हटाया वो अगले 5 साल क्या करेगा : तेजस्वी यादव, राजद pic.twitter.com/DJfBPOOfFI
— ANI_HindiNews (@AHindinews) October 26, 2020
मजुरांना परत आणण्यासाठी विमानाची सोय केली नाही
तेजस्वी यादव डिहरी येथील उमेदवारफतेह बहादुर सिंह यांचा प्रचार करण्यासाठी आले होते. तसेच लॉकडाउन काळात बिहारच्या मजुरांना परराज्यातून परत आणण्यासाठी यांनी काहीच व्यवस्था केली नाही. तेच नितीश कुमार आज हेलिकॉप्टरमधून फिरत आहेत.