ETV Bharat / bharat

कुमार विश्वास यांची चोरीला गेलीली फॉर्च्युनर गाडी अखेर सापडली!

author img

By

Published : Oct 19, 2020, 6:22 PM IST

कुमार विश्वास यांची चोरी गेलीली फॉर्च्युनर गाडी शोधण्यात इंदिरापुरम पोलिसांना यश मिळाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.

police-recovered-kumar-vishwas-car-in-ghaziabad
कुमार विश्वास यांची चोरी गेलीली फॉर्च्यूनर गाडी शोधण्यात पोलीसांना यश

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) - गेल्या फेब्रुवारी महिन्यात चोरीला गेलेली कवी कुमार विश्वास यांची फॉर्च्युनर गाडी शोधण्यात इंदिरापुरम पोलीसांना यश मिळाले आहे. यासंदर्भात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून इतर काही महागड्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

गाडी मिळाल्यानंतर कुमार विश्वास यांनी 'अब समझ लो बालक ! नवरात्र में वह फारच्यून (र) मिला है जिसका चालक 'हरि' है.' असे टि्वट करून आनंद व्यक्त केला. गाडी चोरीला गेल्यानंतर कुमार विश्वास यांच्या मॅनेजरतर्फे एफआयआर दाखल करण्यात आला होता. तसेच चोरांनी त्यांच्या गाडीचा नंबर देखील बदलला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गाडी कुमार विश्वास यांच्या ताब्यात दिली जाण्याची शक्यता आहे. चारही आरोपींच्या चौकशीदरम्यान अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यादिशेने पोलीसांनी तपास सुरू केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.