नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत द्वारका जिल्ह्यातील पोलिसांनी रविवारपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी मोफत कॅबची व्यवस्था केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी या कॅबचा वापर करता येऊ शकतो.
ज्येष्ठ नागरिक, एकट्या राहणाऱ्या महिला, आपात्कालीन परिस्थिती किंवा संकटात असलेली कोणतीही व्यक्ती या मोफत कॅबसाठी संपर्क करु शकते, असे द्वारकाचे पोलिस उपायुक्त अँटो अल्फोन्स यांनी सांगितले. सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ८ पर्यंतच या कॅबची सेवा सुरु असणार आहे. मात्र, रात्रीच्या वेळी येणाऱ्या आपात्कालीन परिस्थितीसाठी एक कॅब ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी सामाजिक अंतर राखावे तसेच मास्कचा वापर करणे आवश्यक असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. कॅबच्या सेवेसाठी ९७७३५२७२२२ या क्रमांकावर संर्पक साधण्यास सांगितले गेले आहे.