नवी दिल्ली - पंतप्रधान ग्रामीण डिजिटल शिक्षण अभियानात नोकर भरतीसाठी एका तरुणाने बनावट वेबसाईट सुरू केली होती. या वेबसाईटच्या माध्यमातून त्या तरुणाने शिक्षक भरतीची जाहिरात देऊन १०० जणांकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर सेलने गुन्हा दाखल करुन, पश्चिम बंगालमधून आरोपी प्रसेनजित चटर्जीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये या तरुणाने बनावट वेबसाईट तयार केली होती. यावर त्याने शिक्षक भरतीची जाहीरात दिला. यासाठी अनेकांनी आपले अर्ज दाखल केले. या प्रकरणाची केंद्र सरकारला माहिती मिळाल्यानंतर आईटी विभागांतर्गत चौकशी करण्यात आली. यावेळी ही वेबसाईट बनावट असल्याचे समोर आले.
संपूर्ण प्रकाराची चौकशी केल्यानंतर ही बनावट वेबसाईट पश्चिम बंगामध्ये तयार केली होती. माहिती मिळताच सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी ही साईट लगेच ब्लॉक केली. त्यानंतर आरोपी प्रसेनजित चटर्जीला अटक केली.