ETV Bharat / bharat

कानपूर चकमक प्रकरणी गँगस्टर विकास दुबेच्या साथीदाराला अटक

गुडांच्या गोळीबारात कानपूरमध्ये आठ पोलीस शहिद झाले. या गोळीबारात दया शंकर अग्नीहोत्री(42) या गुंडाचाही समावेश होता. त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

द्या शंकर अग्निहोत्री
द्या शंकर अग्निहोत्री
author img

By

Published : Jul 5, 2020, 1:39 PM IST

लखनऊ - कानपूर पोलिसांनी गुंड विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांना पकडण्यासाठी 25 पथके तयारी केली आहेत. उत्तर प्रदेश राज्यात आणि शेजारील इतर राज्यातही आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, कानपूर पोलिसांनी विकास दुबेच्या एका साथीदाराला अटक केली आहे. गुडांच्या गोळीबारात कानपूरमध्ये आठ पोलीस शहीद झाले. या गोळीबारात दया शंकर अग्नीहोत्री(42) या गुंडाचाही समावेश होता. त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

मुख्य आरोपी विकास दुबे अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. कानपूर परिसरातून आज (रविवार) पहाटे 4.40 वाजता दुबेच्या साथीदाराला अटक करण्यात आली. त्याकडून बंदुक आणि गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी छापा मारला असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी मारल्याने तो सापडला, अशी माहीती पोलीस अधिकारी दिनेश कुमार यांनी दिली. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

विकास दुबेला पोलीस घरी अटक करायला जाण्याआधीच त्याला पोलीस ठाण्यातील कोणीतरी माहिती पुरवली. त्यामुळे तो पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता. पोलीस घरी पोहचताच त्याने गोळीबार केला. यामध्ये 8 पोलीस शहीद झाले, तर सात जण जखमी झाले.

काय आहे घटना?

कानपूर जिल्ह्यातील बिकारु गावात राहणारा विकास दुबे हा कुख्यात गुंड आहे. त्याच्यावर 60 गुन्हे दाखल आहे. राज्यमंंत्र्याची हत्या केल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. शुक्रवारी(3 जुलै) रात्री पोलिसांचे पथक दुबेला पकडण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. पोलीस येत असल्याची त्याला आधीच खबऱ्याने दिली होती. त्यामुळे तो त्याच्या साथीदारांसह पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होता.

घराच्या गेटसमोर त्याने जेसीबी आणून उभे केले होते. तसेच त्याचे साथीदार छतावर बंदुका घेवून थांबले होते. पोलीस पथक गेटवर येताच गुंडांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये आठ पोलीस शहीद झाले. तर सात जण जखमी झाले. या घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला. दुबे हा कुख्यात गुंड असून त्याचे राजकारणी आणि पोलिसांशीही संबध आहेत, अशी माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.