ETV Bharat / bharat

मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिल्या दोन खास भेट वस्तू - शी जिनपिंग भारत दौऱ्यावर

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी महाबलीपूरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट झाली.

मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिल्या दोन खास भेट वस्तू
author img

By

Published : Oct 12, 2019, 10:37 AM IST

चैन्नई - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी महाबलीपूरम येथे जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी पंचरथ या ठिकाणाची पौराणिक माहिती पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग यांना दिली. त्यानंतर मोदींनी दोन खास भेटवस्तू जिनपिंग यांना दिल्या आहेत.

PM To Gift Annam Lamp, Thanjavur Painting To Chinese President
मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दिल्या दोन खास भेट वस्तू

पंतप्रधान मोदींनी तंजावूर शैलीतलं सरस्वतीचं नृत्यू करणारे खास पेंटिंग दिले आहे. हे पेंटिंग अत्यंत पवित्र समजले जाते. याचबरोबर मोदींनी 12 कलाकारांनी 12 दिवसांमध्ये तयार केलेला एक अन्नम खास दिवा जिनपिंग यांना भेट केला आहे. या दोन्ही भेटवस्तू अतिशय सुंदर आहेत. अन्नम दिवा शुद्ध तांब्याचा असून त्यावर सोन्याचा वर्ख आहे. या दिव्याचे वजन 108 किलो आहे.

नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना महाबलीपुरम येथील मंदिरांचे दर्शन घडवले. त्यानंतर पंचरथ येथे दोन्ही नेत्यांनी नारळपाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. जिनपिंग यांचे स्वागत करण्यासाठी महाबलीपूरममध्ये जय्यत तयारी केली होती. महाबलीपूरमच्या 'पंच रथ'जवळ मोदी आणि जिनपिंग यांच्या स्वागतासाठी १८ प्रकारची फळे आणि भाज्या वापरून विशेष कमान उभी करण्यात आली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.