नवी दिल्ली - सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 मे रोजी रेडिओ कार्यक्रम 'मन की बात' च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करणार आहेत. सोमवारी पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना कार्यक्रमाविषयी सूचना मागविल्या आहेत.
-
I look forward to your ideas and inputs for this month’s #MannKiBaat, which will take place on the 31st. You can:
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Record a message by dialling 1800-11-7800.
Write on NaMo App or MyGov. https://t.co/3KdKpSSCUW
">I look forward to your ideas and inputs for this month’s #MannKiBaat, which will take place on the 31st. You can:
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2020
Record a message by dialling 1800-11-7800.
Write on NaMo App or MyGov. https://t.co/3KdKpSSCUWI look forward to your ideas and inputs for this month’s #MannKiBaat, which will take place on the 31st. You can:
— Narendra Modi (@narendramodi) May 18, 2020
Record a message by dialling 1800-11-7800.
Write on NaMo App or MyGov. https://t.co/3KdKpSSCUW
'31 मे ला होणार्या मन की बात कार्यक्रमासाठी मी तुमच्या सूचनांची प्रतीक्षेत आहे. यासाठी आपण 1800-11-7800 वर संदेश रेकॉर्ड करून पाठवू शकता. तसेच नमो अॅपवर किंवा मायगॉववरही लिहून पाठवू शकता, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मन की बातच्या माध्यमातून तिसऱ्यांदा संबोधीत करतील. देशातील लॉकडाऊन 31 मे लाच संपणार आहे. त्यामुळए मन की बातमधून पंतप्रधान पुढील धोरणाची माहिती देण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात ते जनतेला संबोधित करतात.देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व राज्यांना 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.