कानपूर - पंतप्रधान नरेंद्र राज्यातील कानपूर दौऱ्यावर आहेत. काल (शनिवारी) ते नमामी गंगे अभियान अंतर्गत गंगा नदीच्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी अटल घाटावर पायऱ्या चढत असताना त्यांचा पाय घसरला. मात्र, लगेचच त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरले.
शनिवारी राष्ट्रीय गंगा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी येथील अटल घाट सिसमाऊ नाला येथे स्वच्छतेची पाहणी केली. त्याचबरोबर मोदी यांनी गंगा नदीत बोटींग देखील केले. यावेळी मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अनेक मंत्री, उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मोदी यांनी क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद यांना श्रद्धांजली वाहिली.
हेही वाचा - 'पहिल्यांदा भ्रष्टाचाराचं गोमुख स्वच्छ करा', गंगा प्रदूषणावरून अखिलेश यादवांचा मोदींना टोला