ETV Bharat / bharat

'सीमावादावर पंतप्रधान मोदी चीनची भूमिका उचलून धरताहेत'

चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, हे मोदींचे वक्तव्य चीनचीच भूमिका उचलून धरत नाही का? असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे.

कपिल सिब्बल
कपिल सिब्बल
author img

By

Published : Jun 21, 2020, 10:12 PM IST

नवी दिल्ली - चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसने आज(रविवार) टीका केली. मोदींच्या या वक्तव्याचे स्पष्टीकरण काँग्रेसने मागितले आहे. चीनने भारतीय भूमीत घुसखोरी केली नाही, हे मोदींचे वक्तव्य चीनचीच भूमिका उचलून धरत नाही का? असा सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे.

व्हर्च्युअल(ऑनलाईन) पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कपिल सिब्बल म्हणाले, गलवान व्हॅली, प्योंगयांग त्सो लेक आणि हॉट स्प्रिंग भागातील चीनचे अतिक्रमण कधीही मान्य केले जाणार नाही. भारताच्या प्रादेशिक एकात्मतेशी कधीही तडजोड केली जाणार नाही. भारताच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी चीनची प्रत्येक खेळी आम्ही मोडून काढू.

संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी चीनी घुसखोरीबाबत 17 जून आणि 20 जूनला केलेल्या वक्तव्याचा हवालाही कपिल सिब्बल यांनी दिला. एप्रिल आणि मे महिन्यात गलवान व्हॅली, प्योंगयांग त्सो लेक आणि हॉट स्प्रिंग भागात चीनने घुसखोरी केल्याचे वक्तव्य दोन्ही मंत्र्यांनी केले होते. कर्नल संतोष बाबू आणि 19 जवानांनी देशाच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले, हे विसरता कामा नये. जोपर्यंत सीमेवर 'जैसे थे' परिस्थिती होत नाही तोपर्यंत सरकारने वस्तूस्थिती नाकारता कामा नये, असे सिब्बल म्हणाले.

सॅटेलाईट इमेज आणि अनेक तज्ज्ञांनी चीनने घुसखोरी केल्याचे पडताळून पाहिले आहे. मात्र, सरकार चीनने घुसखोरी केली हे मान्य करण्यास तयार नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला. गलवान व्हॅलीच्या फिंगर फोर म्हणजेच चौथ्या डोंगररांगेच्या भागापर्यंत चीनने अतिक्रमण केले असून तेथे बांधकाम केले आहे. चीनने अतिक्रमण केल्याचे सरकार का नाकारत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

चीनला हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न करताना बलिदान दिलेल्या सैनिकांचा हा अपमान नाही का? त्यांचे बलिदान व्यर्थ गेले असे सरकारला वाटते का? असे सिब्बल म्हणाले. सर्वपक्षीय बैठकीनंतर मोदींनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधी पक्ष भाजप सरकारला लक्ष्य करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.