लखनऊ(अयोध्या) - बुधवारी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्य हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन होणार आहे. अयोध्येत मोदी तीन तास थांबणार असून त्यांच्या आगमनाची सर्व तयारी झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येतील वेळापत्रक -
5 ऑगस्टला सकाळी दिल्लीवरून लखनऊसाठी प्रयाण.
9:35 वाजता दिल्लीवरून विशेष विमानाने जाणार लखनऊला.
10:35 वाजता लखनऊ एयरपोर्ट वर होणार विमानाचे लँडिंग.
10:40 वाजता लखनऊवरून हेलिकॉप्टरने जाणार अयोध्येला.
11:30 वाजता अयोध्येतील साकेत महाविद्यालयाच्या मैदानावर उतरणार हेलिकॉप्टर.
11:40 वाजता हनुमान गढीला जाऊन १० मिनिटे करणार पूजा.
12 वाजता राम जन्मभूमि परिसरात पोहचणार.
10 मिनिटात रामलला विराजमानचे घेणार दर्शन.
12:15 वाजता राम मंदिर परिसरात पारिजात वृक्षाचे करणार रोपन.
12:30 वाजता भूमिपूजन कार्यक्रमाला सुरुवात.
12:40 वाजता राम मंदिराच्या पायाची कोनशीला स्थापन करणार.
2:05 वाजता साकेत महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर जाणार.
2:20 वाजता लखनऊ विमानतळासाठी होणार रवाना.