लखनौ - पंतप्रधान मोदी यांनी आज वाराणसीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्जासोबत सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्या नावावर २.५ कोटी रुपयांची संपत्ती. तर, एक भूखंड आणि १.२७ लाखांचे फिक्स डिपॉजीट आहे. तसेच ३८ हजार ७५० रुपये कॅशच्या स्वरुपात त्यांच्याजवळ असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे.
लोकसभा निवडणुकात सर्वांचे लक्ष लागून होते ते पंतप्रधान मोदी यांच्या उमेदवारीवर. त्यांनी आज उत्तरप्रदेशच्या वाराणसी येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामध्ये दाखवलेल्या संपत्तीनुसार मागच्या तुलनेत ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी १ कोटी ५१ लाखांची संपत्ती दाखवली होती.
पंतप्रधान मोदी यांनी शपथपत्रामध्ये आपल्या पत्नीचाही उल्लेख केला आहे. त्यामध्ये त्यांनी जशोदाबेन ह्याच आपल्या पत्नी असल्याचे म्हटले आहे. तर, दरवेळी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवरुन त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आले आहेत. त्यांनी गुजरात विद्यापीठातून एम.ए.ची पदवी प्राप्त केल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांनी १९७८मध्ये दिल्ली विद्यापीठातून बी.ए.ची पदवी घेतली आहे.
मोदींच्या शपथपत्रानुसार त्यांच्याजवळ १ कोटी ४१ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. तर, १.१ कोटींची अचल संपत्ती आहे. त्यांनी २० हजार रुपये कर बचत बॉन्डमध्ये गुंतवले आहेत. तसेच त्यांच्यानावर ७.६१ लाख रुपयांची एनएससी आहे आणि १.९ लाख रुपयांचा एलआयसी विमा काढलेला आहे.
त्यांच्या खात्यामध्ये ४ हजार १४३ कोटी रुपये शिल्लक आहेत. त्यांच्याजवळ ४५ ग्रॅमच्या ४ सोन्याच्या आंगठ्या आहेत. त्यांचे बाजार मुल्य १ लाख १३ हजार रुपये असल्याचे त्यांनी शपथपत्रात सांगितले आहे.