ETV Bharat / bharat

चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली नाही - पंतप्रधान मोदी - सर्वपक्षीय बैठक भारत चीन सीमा वाद

भारत- चीन सीमा वादावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधित केले.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी
author img

By

Published : Jun 19, 2020, 10:04 PM IST

Updated : Jun 19, 2020, 10:13 PM IST

नवी दिल्ली : भारत-चीन सीमा वादात 20 भारतीय जवान हुतात्मा झाल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. यासंबंधी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. थोड्या वेळापूर्वीच बैठक पार पडली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधित केले. चीनने घुसखोरी केल्याचे पंतप्रधान मोदींनी नाकारले, तसेच सीमेवरील परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराला सर्व अधिकार दिले असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

चीनने भारताच्या भूमीत घुसखोरी केली नाही. तसेच भारताची कोणतीही चौकी त्यांनी घेतली नाही.

भारताचे 20 जवान शहीद झाले. मात्र ज्यांनी भारत मातेवर हल्ला करण्याची हिंमत केली त्यांना धडा शिकवला.

कोणतीही कठीण परिस्थिती हाताळण्यास आम्ही तयार

सीमेवरील परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला अधिकार दिले आहेत.

देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी इफ्रास्ट्रक्चर विकासाला महत्त्व देण्यात आले आहे.

फायटर विमाने, अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा यांसारख्या लष्करासाठी महत्त्वाच्या बाबींना प्राधान्य देण्यात येत आहे.

आज भारतीय लष्कराची एवढी क्षमता आहे, की कोणी आपल्या एक इंच जमीनीकडेही डोळे वर करून पाहू शकत नाही. वेगवेगळ्या(सेक्टर) सीमा भागात एकाच वेळी कूच करण्याची लष्करात क्षमात आहे.

लष्कराने देशाच्या सुरक्षेत कोणतीही उणीव सोडलेली नाही. हवाई दल, नौदल, आणि लष्कर सर्व काही उपाययोजना करत आहे.

सीमेवर जे झाले, निश्चतच त्यामुळे देशामध्ये क्रोधाची भावना निर्माण झाली आहे. आजच्या बैठकीतही ते दिसून आले.

भारताला शांतता आणि मैत्री हवी आहे. मात्र, देशाची सार्वभौमता सर्वश्रेष्ठ आहे.

सीमेवर नव्याने करण्यात आलेल्या बांधकामामुळे गस्त वाढली आहे. त्यामुळे सीमेवर सतर्कता वाढली असून हालचालींची त्वरीत माहिती होते.

सीमेवरील ज्या भागांमध्ये पहिले कमी लक्ष होते. अशा ठिकाणीही आपले सैनिक परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. ज्यांना पहिले कोणी हटकत नव्हते, तेथे आपले सैनिक जाऊन अडवू लागले आहेत.

व्यापार, दहशतवाद आणि संपर्कव्यवस्था याबाबात भारताने कधीही बाहेरच्यांचा दबाव स्वीकारला नाही.

संपूर्ण देशाला मोदींनी विश्वास द्यावा

चीनबरोबरच्या सीमा वादानंतर पुढे काय? सीमेवर जैसे थे परिस्थिती आणि चीनचे सैनिक माघारी जातील याबाबत संपूर्ण देशाला तुमच्याकडून विश्वास हवा आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. लष्कराच्या पाठीशी काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकमताने असल्याचे त्या म्हणाल्या.

या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सरकारला काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे मागितली. तसेच चीनने 5 मे ला पहिल्यांदा भारतीय भूमीत अतिक्रमण केले तेव्हा बोलवण्यात यायला हवी होती, असे मत व्यक्त केले. सीमेवरील सद्यस्थिती आणि लष्करी तयारीची माहिती त्यांनी सरकारकडे मागितली.

Last Updated : Jun 19, 2020, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.