डेहराडून - उत्तराखंडमधील गढवाल हिमालय रांगांमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. देशामध्ये लॉकडाऊन असूनही ठरवण्यात आलेल्या ब्राह्ममुहुर्तावर दरवाजे उघडण्यात येणार आहेत. चारधाम यात्रेमध्ये गर्दी होणार नाही, याची काळजी घेणार असल्याचे उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे 29 एप्रिलला आणि बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 30 एप्रिलला उघडतील. त्याचबरोबर गंगोत्री-यमुनोत्री धामचे दरवाजेही 26 एप्रिलला उघडणार आहेत. राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम चारधाम यात्रेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. कोरोनामुळे टॅक्सी चालक, हॉटेलवाले, व्यापारी आणि चारधाम यात्रेशी संबंधित स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
चारधाम यात्रेसाठी सर्व तयारी करण्यात येत आहे. कोरोना साथीच्या काळातही सरकारने आवश्यक पावले उचलली जात आहेत. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दरम्यान सरकारने हे स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत चारधाममध्ये गर्दी होणार नाही. चारधामचे दरवाजे निश्चित तारखांना उघडणार आहेत. या काळात मर्यादित संख्येने पुजारी पूजा करतील.
उत्तराखंडमधील चारधाम यात्रेचं प्रवेशद्वार म्हणून हरिद्वार हे गाव ओळखले जाते एप्रिल-मे या काळात या चारही मंदिरांचे दरवाजे उघडतात आणि अधिकृतपणे ही यात्रा सुरू होते. याच काळात आपल्याकडे सुट्टय़ांचा काळ आणि उन्हाळासुद्धा तीव्र असल्यामुळे भटकंतीसाठी हिमालयात चारधामला जाणे अतिशय सोयीचे ठरते. दिवाळीपासून पुन्हा हे चारधाम सहा महिन्यांसाठी बंद असतात.