ETV Bharat / bharat

'भारत-चीन सीमावादाच्या चर्चेवर जनता लक्ष ठेवून आहे' - भारत चीन लष्करी स्तरावर चर्चा

भारत आणि चीनचे लष्करी अधिकारी चर्चेची दुसरी फेरी लवकरच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्योंगयांग त्सो आणि डेपसांग भागातील तणाव कमी करण्यासाठी ही चर्चा होणार होणार आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 10, 2020, 2:17 PM IST

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवरील तणाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये आता दुसऱ्यांदा चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. 'चीनबरोबर चर्चेच्या प्रक्रियेवर आणि प्रगतीवर जनता लक्ष ठेवून असल्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम म्हणाले'.

'सीमेवरील तणाव कमी होत असल्याचा आम्हाला आनंदच आहे. मात्र, तणाव कमी करण्यासाठी जी चर्चा होत आहे, त्या प्रक्रियेकडे आणि प्रगतीकडे जनता लक्ष ठेऊन आहे. 5 मे 2020 ला सीमेवर जी स्थिती होती, ती पुन्हा झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा', असे ट्विट पी. चिदंबरम यांनी केले आहे. चीनबरोबर सीमावाद सुरू झाल्यापासून काँग्रेस पक्षाने भाजप सरकारवर सतत टीका केली आहे. केंद्र सरकार गलवान व्हॅलीवर भारताचा दावा कमकूवत करत असल्याचा आरोप काल(गुरुवार) काँग्रेसने केला. तसेच 'बफर झोन' भारतीय भूभागात केला जातोय का? याचे उत्तर सरकारकडे मागितले.

भारत आणि चीनचे लष्करी अधिकारी चर्चेची दुसरी फेरी लवकरच करणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्योंगयांग त्सो आणि डेपसांग भागातील तणाव कमी करण्यासाठी ही चर्चा होणार होणार आहे. सीमेवरी रणगाडे, तोफा आणि इतर युद्धाचे सामान मागे घेण्यासंबंधी अधिकाऱ्यामध्ये चर्चा होईल. विशेष प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाल्यानंतर सीमेवरील वाद निवळण्यास सुरुवात झाली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग ई यांच्यमध्ये ही चर्चा झाली होती.

या सोबतच वर्किंग मॅकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अ‌ॅन्ड को ऑरडिनेशन ऑन इंडिया चायना बॉर्डर अफेअर्स (WMCC) ची भेटही लवकरच होणार असल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. गलवान व्हॅलीतील पेट्रोलिंग पॉईन्ट 15 आणि हॉट स्प्रिंग भागातून चिनी लष्कर मागे सरकले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.