ETV Bharat / bharat

पंजाबच्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडला, साडे सात तास चालली सर्जरी - पंजाब

पटियाला येथे निहंगा जमातीच्या लोकांनी केलेल्या हल्ल्यात एका पोलिसाचा हात कापला गेला होता. साडेसात तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर या पोलिसाचा हात पुन्हा जोडला गेला आहे.

patiala policeman whos hand chopped by nihang sikh had successfully operate chandigarh pgi
पंजाबच्या पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडला
author img

By

Published : Apr 13, 2020, 10:08 AM IST

चंदिगड - पंजाबच्या पटियाला येथील निहंगा शीखांच्या सोबत झालेल्या भांडणात हात कापल्या गेलेले पोलीस अधिकारी हरजीत सिंह यांच्यावर चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पीजीआयएमईआर) रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल साडे सात तासांच्या अथक प्रयत्नांनतर डॉक्टरांनी त्यांचा हात यशस्वीरित्या जोडला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटद्वारे याची माहिती दिली.

patiala policeman whos hand chopped by nihang sikh had successfully operate chandigarh pgi
पंजाबच्या पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडला

हेही वाचा... लॉकडाऊन : बाहेर फिरण्यास मज्जाव केल्यामुळे पोलिसाचा तलवारीने कापला हात; अन्य दोन जखमी..

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह आणि इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर रविवारी सकाळी निहंगा समुदायातील टोळक्याकडून हल्ला करण्यात आला. कर्फ्यू पास मागितल्याने तसेच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील काही जणांनी त्यांच्यावप हल्ला केला होता. या हल्ल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. हल्ला झाल्यानंतरव हल्लेखोरांनी पळ काढला. पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली आहे. यामधील पाच जण हल्लेखोर आहेत. अटक करताना पोलीस आणि आरोपींमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात अटक करण्यात आलेला एक आरोपी जखमी झाला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.