ETV Bharat / bharat

सिंगापूरमधील प्रवासी निर्बंध शिथिल... 'क्रूझ टू नोव्हेअर'अंतर्गत करता येईल सागरी सफर - Singapore travel restrictions relaxed

कोरोना प्रदुर्भाव वाढल्याने सिंगापूरमध्ये खबरदारी म्हणून प्रवासी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता हे निर्बंध शिथिल करण्यात आले असून, कोरोना काळात देशातील नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्याचा अनुभव देण्याच्या हेतून 'क्रूझ टू नोव्हेअर' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Oct 10, 2020, 6:46 PM IST

सिंगापूर - देशातील प्रवासी वाहतुकीवरील निर्बंध शिथिल करण्यसाठी व नागरिकांना सुखद प्रवासाचा अनुभव देण्याच्या हेतूने सिंगापूर प्रशासनाने दोन जहाजांना नागरी वाहुतकीसाठी परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात 'लाइन्स वर्ल्ड ड्रीम' आणि डिसेंबर महिन्यात 'रॉयल कॅरिबियन' हे जहाज नागरिकांच्या सेवेला हजर असणार आहेत.

कोरोना प्रदुर्भाव वाढल्याने सिंगापूरमध्ये खबरदारी म्हणून प्रवासी निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता हे निर्बंध शिथिल करण्यात आले असून, कोरोना काळात देशातील नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्याचा अनुभव देण्याच्या हेतून 'क्रूझ टू नोव्हेअर' या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गत जहाज प्रवाशांना एका ठिकाणाहून उचलेल आणि सैर केल्यानंतर पूर्वीच्याच ठिकाणी आणून सोडणार आहे.

जहाज फक्त ५० टक्के क्षमतेनेच सैर करेल आणि यात फक्त सिंगापूरमधील नागरिकांनाच प्रवास करता येणार आहे. यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. जहाजात शिरण्याआधी नागरिकांना कोविड चाचणी करावी लागणार आहे. त्यानंतरच त्यांना जहाजातून प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा- पाकव्याप्त काश्मीरमधून हत्यारांची तस्करी, जवानांनी उधळला कट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.