ETV Bharat / bharat

कोरोनाचा प्रसार थांबेना...! संसदीय स्थायी समितीची सोमवारी बैठक - भारत कोविड अपडेट

संसदेच्या आरोग्य विषयक स्थायी समितीची उद्या(सोमवार) बैठक आहे. देशातील कोरोनाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 6, 2020, 8:16 PM IST

नवी दिल्ली - देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ९० हजार ६३३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. या पार्श्वभूमीवर संसदेच्या आरोग्य विषयक स्थायी समितीची उद्या(सोमवार) बैठक आहे. देशातील कोरोनाची स्थिती आणि त्यावरील उपाययोजनांवर बैठकीत चर्चा होणार आहे.

देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४१ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी याबाबत माहिती दिली. यासोबतच, काल दिवसभरात एकूण १,०६५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर, देशातील एकूण कोरोना बळींची संख्या ७० हजार ६२६ झाली आहे. आतापर्यंत देशभरात ४१ लाख १३ हजार ८१२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यांपैकी ८ लाख ६२ हजार ३२० रुग्ण अ‌ॅक्टिव्ह आहेत. तसेच, आतापर्यंत ३१ लाख ८० हजार ८६६ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

दरम्यान, काल दिवसभरात ७० हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानुसार देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ७७.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. यासोबतच देशातील मृत्यूदरही कमी झाला असून, १.७३ टक्क्यांवर झाला आहे.सद्य स्थितीत भारतात प्रत्येक दिवशी १ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत आहे. आत्तापर्यंत ७० हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यूमध्येही जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझील आणि अमेरिकेत कोरोनामुळे भारतापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात विचार करता इतर देशात भारतापेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.