नवी दिल्ली - सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. 13 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
४.०० PM - देशातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी राखीव वेळ मिळावा अशी मागणी तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेसह इतर विरोधी पक्षांनी केली आहे.
-
Trinamool Congress (TMC) along with other opposition parties including Shiv Sena have given notice to Chairman of Rajya Sabha M Venkaiah Naidu seeking short duration discussion on 'Economic Crisis in India and how to improve the situation'.
— ANI (@ANI) November 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trinamool Congress (TMC) along with other opposition parties including Shiv Sena have given notice to Chairman of Rajya Sabha M Venkaiah Naidu seeking short duration discussion on 'Economic Crisis in India and how to improve the situation'.
— ANI (@ANI) November 18, 2019Trinamool Congress (TMC) along with other opposition parties including Shiv Sena have given notice to Chairman of Rajya Sabha M Venkaiah Naidu seeking short duration discussion on 'Economic Crisis in India and how to improve the situation'.
— ANI (@ANI) November 18, 2019
२.५७ PM - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भाषणाची सांगता.
२.४१ PM - माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भाषणाला सुरुवात.
२.४० PM - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या २५० व्या अधिवेशनाच्या निमित्ताने बोलताना देशाच्या जडणघडणीत राज्यसभेची भूमिका मोलाची असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
१२:४८ PM - पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या 250 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने दुपारी 2 वाजता राज्यसभेत भाषण करतील.
१२:२० pm - राज्यसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकुब
12:20 pm - काश्मिरच्या परिस्थितीबद्दल कॉंग्रेस, द्रमुक आणि नॅशनल कॉन्फरन्सकडून निषेध
- ११:११ AM - भाजप खासदार मनोज तिवारी सायकल घेऊन संसदेत दाखल झाले.
- ११:४० AM - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी "विरोधी पक्षांनी आपले मत व्यक्त करण्यास व योग्यतेने त्यांचे मत व्यक्त करण्यास सक्षम व्हावे, यासाठी सरकारकडून सभागृह सुरळीतपणे चालविणे आवश्यक आहे. "हे संसदीय लोकशाहीचे सार आहे," असे लोकसभेत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अधिवेशनापूर्वी सांगितले.
११:०७ AM - तृणमुल काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेने काश्मीरच्या परिस्थितीबाबत लोकसभेला तहकूब करण्यासाठी गोंधळ गातला. जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय परिषद नेते फारूक अब्दुल्ला यांना ताब्यात घेतल्याबद्दल तृणमूल काँग्रेस पक्षाने लोकसभेत तहकुबीसाठी नोटीस दिली. काँग्रेस आणि शिवसेना, तसेच, जम्मू-काश्मीरमधील "अस्थिरता" आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान याविषयी तहकुब साठी नोटिस दिल्या आहेत.
- 11:02 AM - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या परिसरामध्ये माध्यमांना संबोधित केले
हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर माध्यमांना संबोधित केले आणि ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांत आम्हाला सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे. समर्थनामुळे संसद अधिवेशन यशस्वी झाले आहेत. सर्व खासदारांचे आणि हे संपूर्ण संसदेचे यश आहे. मी सर्व खासदारांचे आभार मानतो आणि मला आशा आहे की हे अधिवेशन देशाच्या प्रगतीच्या अजेंडावरही काम करेल, "असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबपर्यंत चालणार आहे. त्यादरम्यान दोन्ही सभागृहांमध्ये २७ विधेयके मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ विधेयके मंजूर करण्यात आली होती. त्यात जम्मू-काश्मीरचे विभाजन आणि विशेष अधिकार रद्द करणारे विधेयक आदी विधेयकांचा समावेश होता.
१०:२३ AM - अधिवेशनाला सुरूवात : आर्थिक मंदी, काश्मीरची परिस्थिती यावरून लोकसभेत गदारोळ