ETV Bharat / bharat

सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाविरोधात पालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

author img

By

Published : Jun 10, 2020, 11:32 AM IST

सीबीएसई अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांची उरलेल्या विषयांची परीक्षा 1 जुलैपासून घेतली जाणार असल्याची बोर्डाने 18 मे रोजी जाहीर केले होते. कोरोनामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे पालकांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

cbse students
सीबीएसई बोर्डाच्या निर्णयाविरोधात पालकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली - सीबीएसई अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांची उरलेल्या विषयांची परीक्षा 1 जुलैपासून घेतली जाणार असल्याची बोर्डाने 18 मे रोजी जाहीर केले होते. कोरोनामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असल्यामुळे पालकांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पालकांनी जनहीत याचिका दाखल करून 12 वीच्या परीक्षा रद्द करण्याची आणि झालेल्या परीक्षेच्या सरासरी गुणांनुसार निकाल जाही करण्याची मागणी केली आहे.

याचिकेत काय म्हटलयं?

एआयआयएमस् च्या माहितीनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जुलै महिन्यामध्ये वेगाने वाढणार आहे. याचाच अर्थ 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान विद्यार्थ्य्यांची परीक्षा घेतली तर त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. तसेच मणुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जारी केलेल्या सूचनेनुसार देशभरात 15 हजार परीक्षा केंद्र आहेत. जे याआधी 3 हजार होते. याचिकाकर्त्यांचे म्हणणं आहे की, परीक्षा केंद्रांची संपूर्ण स्वच्छता आणि निर्जंतूकीकरण नीट केले जाईल का? याची शक्यता कमी वाटते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्षभराच्या इंटरनल मुल्यमापन आणि परीक्षा घेतल्या गेलेल्या विषयांच्या सरासरी गुणांवरून बोर्डाने निकाल जाहीर करावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.