श्रीनगर - पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील हीरानगर भागामध्ये त्यांनी गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
सोमवारी सकाळी १०.५०च्या दरम्यान कारोल सीमेपलीकडून गोळीबार सुरू झाला. त्याला सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हा गोळीबार रात्रीही सुरू होता आणि मंगळवारी पहाटे साडेचारच्या दरम्यान तो थांबल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, भारतीय जवानांनी पाकिस्तानने फेकलेले एक मॉर्टर शेलही निकामी केल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. राजौरी जिल्ह्याच्या कलाल भागामध्ये हा जिवंत मॉर्टर शेल मिळाला होता. जवानांनी तातडीने बॉम्ब शोध पथकाला पाचारण करून, हा शेल निकामी केला.
हेही वाचा : कोरोना संकटातही फ्रान्स राफेल विमानांचा वेळेत पुरवठा करणार