ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून क्षेपणास्त्राची चाचणी; काश्मीर मुद्द्यावर शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न - gaznavi missile test

पाकिस्तानने बुधवारी संध्याकाळी गझनवी नामक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती लष्कर प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. यामधून दोन्ही देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती असल्याचा आभास पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करण्यात येत आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 29, 2019, 3:31 PM IST

Updated : Aug 30, 2019, 9:23 AM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानने बुधवारी संध्याकाळी गझनवी नामक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती लष्कर प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. या क्षेपणास्त्राची क्षमता २९० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची असून, कमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रकारात याचा समावेश होतो. काश्मीर मुद्द्यावरून भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानने क्षेपणास्त्राची चाचणी करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.

दोन्ही देशांमध्ये युध्दजन्य परिस्थिती असल्याचा आभास पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केला जात आहे. याचाच भाग म्हणून क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली. भारताकडे या प्रकारातील पृथ्वी, धनुष, सागरिका, प्रहार व अग्नी अशी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.

हेही वाचा :ETV facebook ETV ETV 'काश्मीर तुमचा कधी होता? ज्यासाठी तुमचे नेहमीच रडगाणे सुरू असते' राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानवर हल्लाबोल

आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटाघाटींमध्ये पाकिस्तानला अपयश आल्याने पाकिस्तान बिथरला आहे. यामुळे पाकिस्तानचे राजकीय नेते भारताशी युद्ध करण्याच्या धमक्या देत आहेत. मात्र, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून, पाकिस्तानने भारताच्या देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करणे बंद करावे, असे भारताने स्पष्ट केले आहे.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने भारताविरोधात कुरघोड्या करण्यास सुरुवात केली.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Aug 30, 2019, 9:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.