ETV Bharat / bharat

पाकिस्तानने पुन्हा केले नियंत्रण रेषेवरील युद्ध बंदीचे उल्लंघन; कुपवाडा व बारामुल्लात चकमक - Baramulla ceasefire News

कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज युद्धबंदीचे उल्लंघन केले. दोन्ही सैन्यांमध्ये गोळीबार सुरू असून यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. शुक्रवारी देखील पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील द्विपक्षीय युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.

Line of Control
नियंत्रण रेषा
author img

By

Published : Jun 20, 2020, 4:36 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा आणि बारामुला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने आज युद्धबंदीचे उल्लंघन केले. दोन्ही सैन्यांमध्ये गोळीबार सुरू असून यात जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाक सैन्याने कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेवरील गोळीबार सुरू केला. त्यामुळे भारतीय सैन्याला देखील पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी गोळीबार सुरू करावा लागला. सध्या केरन सेक्टरमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी तालुक्यातील हाजी पीर सेक्टरमध्ये देखील दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला आहे. शुक्रवारी देखील पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील द्विपक्षीय युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.

चीन आणि पाकिस्तान या भारताच्या दोन्ही शेजारी राष्ट्रांनी सीमेवर कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. सध्या चीन आणि भारताचे संबध प्रचंड ताणले असून उभय देशांमध्ये चर्चा सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.