ETV Bharat / bharat

पी. चिदंबरम यांना दोन तासात हजर राहण्याचे आदेश; सीबीआयने घराबाहेर लावली नोटीस - cbi notice to chidanbaram

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. ​​चिदंबरम यांच्या निवासस्थानासमोर नोटीस लावली असून त्यांना पुढील दोन तासात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पी. चिदंबरम
author img

By

Published : Aug 21, 2019, 12:58 AM IST

नवी दिल्ली- केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. ​​चिदंबरम यांच्या निवासस्थानासमोर नोटीस लावली असून त्यांना पुढील दोन तासात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • Delhi: Central Bureau of Investigation (CBI) has put up a notice outside the residence of P Chidambaram to appear before them in the next two hours. Earlier today, Delhi High Court had dismissed his both anticipatory bail pleas in connection with INX Media case. pic.twitter.com/IeEI5IkvGF

    — ANI (@ANI) August 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मंगळवारी सकाळी दिल्ली उच्च न्यायालयाने आयएनएक्स मीडिया प्रकरणातील चिंदबरम यांचे दोन अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते. मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम चिंदबरम यांच्या घरी दाखल झाली होती. मात्र, चिंदबरम त्यावेळी घरी उपस्थित नव्हते. दरम्यान, सीबीआयने चिदंबरम यांना दोन तासात हजर राहण्याची नोटीस बजावल्याने त्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

काय आहे आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरण?

आयएनएक्स माध्यम व्यवहार पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना २००७ मध्ये झाला होता. यामध्ये आयएनएक्स या माध्यम समूहाला ३०५ कोटींची परदेशी गुंतवणूक मिळवून देण्यासाठी 'इन्वेस्टमेंट प्रमोशन बोर्ड' तर्फे मंजुरी देण्यात आली होती. ही मंजुरी देताना गैरव्यवहार केल्याचा ठपका चिदंबरम यांच्यावर आहे. १५ मे २०१७ ला सीबीआयने याप्रकरणी खटला दाखल केला आहे. तर २०१८ मध्ये सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रीगचा खटला दाखल केला आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.