ETV Bharat / bharat

देशातील 700 पेक्षा जास्त विद्यापीठांनी परीक्षांबाबतची स्थिती युजीसीला कळवली - विद्यापीठ परीक्षा बातमी

युजीसीने 6 जुलैला देशातील सर्व शैक्षणिक संस्थाना सहामाई आणि वार्षिक परीक्षा घेण्याबाबत नव्याने नियमावली जारी केली आहे. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे अनेक विद्यापीठांचे नियोजन आहे. मात्र, कोरोनाची स्थितीवर परीक्षा घ्यायच्या का नाही ते अवलंबून असेल.

विद्यापीठ अनुदान आयोग
विद्यापीठ अनुदान आयोग
author img

By

Published : Jul 18, 2020, 1:22 PM IST

नवी दिल्ली - देशभरामध्ये मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार झाल्यापासून शाळा महाविद्यालये बंद आहेत. अनेक विद्यापीठांच्या सहामाई आणि वार्षीक परीक्षा खोळंबून पडल्या आहेत. परीक्षा घ्याव्या, की नाही यावर राज्य तसेच केंद्रीय स्तरावर खल सुरु आहे. दरम्यान, 755 विद्यापीठांनी परीक्षेबाबतची स्थिती विद्यापीठ अनुदान आयोगाला कळवली आहे.

युजीसीने 6 जुलैला देशातील सर्व शैक्षणिक संस्थाना सहामाई आणि वार्षिक परीक्षा घेण्याबाबत नव्याने नियमावली जारी केली आहे. एकूण 755 विद्यापीठांपैकी 321 राज्य विद्यापीठे, 274 खासगी, 120 स्वायत्त आणि 40 केंद्रीय विद्यापीठे आहेत. या सर्व विद्यापीठांनी युजीसीला परीक्षांबाबतची स्थिती सांगितली आहे.

560 विद्यापीठांपैकी 194 विद्यापीठांनी आधीच परीक्षा घेतल्या आहेत. तर 366 विद्यापीठे ऑगस्ट किवा सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याचे नियोजन आखत आहेत. तर काही विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या बॅचेस परिक्षेस पात्र नसल्याचे सांगितले.

देशामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. मागील 24 तासात देशात 34 हजार 884 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले. तर 671 जण दगावले. देशात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 10 लाख 38 हजार 716 वर पोहचल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. सध्या 3 लाख 58 हजा 692 अॅक्टिव्ह रुग्ण असून 6 लाख 53 हजार 751 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. 26 हजार 273 जण दगावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.