नवी दिल्ली - गेल्या काही दिवसात दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. शहरातील रुग्णालयांमधील जवळपास 65 टक्के कोविड रुग्णांसाठीचे बेड रिक्त आहेत. ही आकडेवारी दिल्ली कोरोना अॅपच्या माध्यमातून समोर आली आहे.
हेही वाचा - 'मोदींना देशातील घडामोडींची जराही फिकीर नाही, त्यांच्यासाठी त्यांची 'इमेज' महत्त्वाची'
सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये कोविड बेडची रिक्त संख्या जास्ती आहे. दिल्लीतील सर्वात मोठे कोविड केअर सेंटर असलेल्या LNJP रुग्णालयात 2 हजार बेडपैकी 1 हजार 545 बेड रिक्त आहेत. तर, दुसरीकडे GTB रुग्णालयामध्ये 1 हजार 500 बेडपैकी 1 हजार 321 बेड सध्या रिक्त आहेत.
हेही वाचा - संतापजनक..! हाथरसच्या आणखी एका ६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कारामुळे मृत्यू
दरम्यान, कोरोना अॅपवरील आकडेवारीनुसार सध्या दिल्लीत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. यामुळेच दिल्लीतील अनेक खासगी, सरकारी कोविड केअर सेंटर आणि इतर रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठीचे बेड सध्या रिक्त होत आहेत.