अजमेर (राजस्थान) - कुंकू सौभाग्यवतींच लेणं मानल जाते. तिच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी डोक्यात कुंकू लावतात. परंतु, कुंकू नैसर्गिक असून झाडापासून प्राप्त होते, याबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. हे झाड सामान्यतः हिमालय क्षेत्रात आढळते. मात्र, राजस्थानसारख्या उष्ण आणि वाळवंटी प्रदेशात याचे झाड लागणे हे दुर्मिळच म्हणावे लागेल. अजमेरच्या अशोक जाटोलिया यांच्या घरी हे झाड लागले आहे.
कुंकू सौभाग्यवतींच लेण मानल जाते. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पत्नी कपाळावर आणि भांगात कुंकू लावतात. परंतु, कुंकू नैसर्गिक असून झाडापासून प्राप्त होते, याबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. कुंकवाचे झाड डोंगराळ भागात आढळते. मात्र, राजस्थानसारख्या वाळवंटी भागात हे झाड लागले असून ते येथील स्थानिकांच्या आस्थेच प्रतिक ठरले आहे. अजमेरच्या अशोक जाटोलिया यांना बागकामाची आवड आहे. त्यांनी ७ वर्षाआधी एक रोपटे भोपाळहुन आणून आपल्या बागेत लावले होते. तेव्हा त्यांना ते कुंकूचे झाड असेल याची कल्पनाही नव्हती. मात्र, याला फळं लागल्यानंतर त्यांची उत्सुकता वाढली आणि त्यांनी या झाडाची माहिती घेतली तेव्हा त्यांना हे कुंकवाचे झाड असल्याचे कळले. हळुहळु सर्व परिसरात ही बातमी पसरली आणि लोक त्यांच्याकडे येऊन कुंकू घेऊन जायला लागले. आज येथील स्थानिक या झाडाला पवित्र मानून याची पूजा करतात.
कुंकवाचे झाड, याला रोहिणी, शेंद्री तर इंग्रजीत वर्मिलियन ट्री म्हणूनही ओळखले जाते. साधारणत: बाजारात मिळणाऱ्या रासायनिक लाल कुंकवापेक्षा नैसर्गिक कुंकवाचा रंग वेगळा असतो. मारुतीला वाहणाऱ्या शेंदुरासारखा या कुंकवाचा चा रंग असतो. झाडाला लागलेल्या फळातील बियांमध्ये हा रंग असतो. अजमेर आणि आसपासच्या परिसरातील अनेकजण अशोक यांच्याकडे या कुंकवासाठी येतात. येथील प्रत्येक मंदिरात या झाडाचे कुंकू चढवण्यात आले असल्याचेही त्यांच्या पत्नी सुनिता यांनी सांगितले. सध्या जाटोलिया कुटुंब या झाडाची विशेष देखरेख करत आहेत. या झाडाला पाहण्यासाठी त्यांच्याकडे दररोज लोक येतात, आणि कुंकवाचे फळ घेऊन जातात. इतकेच नव्हे तर, दिवाळीला या झाडाची पूजादेखील केली जाते.