मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे अनेक देशांना आर्थिक फटका बसत आहे. कोरोनामुळे सध्या जगभरात कच्च्या तेलाची मागणी घटली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. या किमती गेल्या १८ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत.
या किमती नीचांकी पातळीवर पोहोचण्यास आणखी एक कारण आहे. ते म्हणजे, रशिया आणि सौदी अरेबिया या प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये सुरु असलेले 'प्राईस वॉर'.
सोमवरी ब्रेंट क्रूडचे दर ८७ टक्क्यांनी घसरुन २२.७६ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. तर, टेक्सस इंटरमीडिएट क्रूड ऑईल ६.६ टक्क्यांनी घसरून २०.०९ डॉलर प्रति बॅरल पोहोचले होते. परिणामी ब्रेंट आणि टेक्सस क्रूड ऑईल अनुक्रमे नोव्हेंबर आणि फेब्रुवारी २००२ च्या पातळीवर आले. तर, मंगळवारी या किमतीत काही प्रमाणात सुधारण झाली.