नवी दिल्ली - देशभरामध्ये कोरोना विषाणूमुळे 21 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व नागरिक घरांमध्ये कोंडले गेल्याने सोशल मिडिया साईटवरून एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे प्रमाण वाढले आहे.लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर व्हिडिओ कॉलिंगचे प्रमाण फेसबुकवर 70 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे फेसबुकने नागरिकांना नवीन फिचर देण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक खाते नसतानाही युझरला लाईव्ह व्हिडिओ पाहता येणार आहे.
ही सुविधा अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिममध्ये आता उपलब्ध असून असून आयओएस ऑररेटिंग सिस्टिमवर लवकरच उपलब्ध होणार आहे. याबरोबरच पब्लिक स्वीच टेलिफोन नेटवर्क असा पर्याय फेसबुक युझर्सला देण्यात येणार आहे. त्यामुळे टोल फ्रि क्रमांकावर लाईव्ह व्हिडिओ फक्त ऐकता येणार आहे. तसेच लाईव्ह व्हिडिओ करताना 'ऑडिओ ओनली' असा पर्याय देण्यावरही फेसबुक काम करत आहे.
त्यामुळे फेसबुक खाते नसतानाही तुम्ही एकमेकांच्या संपर्कात राहू शकता. देशात टाळेबंदी असताना नागरिक एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यामुळे फेसबुक आणि इन्स्टाग्रामणे व्हिडिओची क्लालिटीदेखील कमी देण्यास सुरुवात केली आहे.