स्टॉकहोम - शांततेच्या नोबेल पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचे शांततेचे नोबेल पारितोषिक जागतिक अन्न कार्यक्रमाला (World Food Programme) जाहीर झाले आहे. 'जागतिक अन्न कार्यक्रम' ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या अतंर्गत काम करते.
-
BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2020 Nobel Peace Prize to the World Food Programme (WFP).#NobelPrize #NobelPeacePrize pic.twitter.com/fjnKfXjE3E
">BREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2020
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2020 Nobel Peace Prize to the World Food Programme (WFP).#NobelPrize #NobelPeacePrize pic.twitter.com/fjnKfXjE3EBREAKING NEWS:
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2020
The Norwegian Nobel Committee has decided to award the 2020 Nobel Peace Prize to the World Food Programme (WFP).#NobelPrize #NobelPeacePrize pic.twitter.com/fjnKfXjE3E
जागतिक अन्न कार्यक्रमाने भूकेविरोधात मोठी लढाई दिली आहे. जगात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी प्रयत्न करत आहेत. 2019मध्ये जागतिक अन्न कार्यक्रमाने 88 देशातील 100 कोटी लोकांना मदत केली आहे. प्रभावीत क्षेत्रात भुकेविरोधात लढण्यसाठी आणि शांती कायम ठेवण्यात या कार्यक्रमाने भूमिका बजावली आहे. जागतिक भूकेच्या प्रश्नांकडे लक्ष वळवण्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाला हे पारितोषिक देण्यात आले आहे.
6 ऑक्टोबरला भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले. भौतिकशास्त्रातील 2020चे नोबेल पारितोषिक तीन शास्त्रज्ञांना विभागून देण्यात आले आहे. रॉजर पेनरोझ, रेनहार्ड गेन्झेल आणि आंद्रेया गेझ अशी पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांची नावे आहेत. तर 7 ऑक्टोबरला रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौदना यांना जिनोम एडिटिंगसाठी (गुणसtत्रांत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया) नवी पद्धती विकसित केल्याबद्दल देण्यात आले. तर 8 ऑक्टोबरला यावर्षीचे साहित्यातील नोबेल पारितोषिक अमेरिकेतील कवयित्री लुईस ग्लुक यांना जाहीर झाले.
गेल्या वर्षी यांना मिळाले होते -
इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना 2019 शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. अहमद अली यांनी शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबरचा सीमावाद सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दोन्ही देशांमध्ये शांती नांदण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.
तथापि, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कासाठी नामांकन मिळाले होते. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संघर्षामध्ये मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांना हे नामांकन देण्यात आले होते.
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्यूपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.