ETV Bharat / bharat

'जगातील कोणतीही शक्ती अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळं करू शकत नाही' - अरुणाचल प्रदेशवर चीनला दावा

ओडिशाचे लोकसभा खासदार प्रसन्ना आचार्य यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना चीनच्या वक्तव्याचा निषेध केला. 'अरुणाचल प्रदेश भारताचा भाग नाही, असे चीन वारंवार म्हणत आहे. ही एक जुनी कथा आहे. अरुणाचल हा भारताचा एकात्म भाग आहे, हे जगाने मान्य केलं आहे. चीन सत्य का नाकारत आहे, याचं मला आश्चर्य वाटतंय', असे आचार्य म्हणाले.

खासदार प्रसन्ना आचार्य
खासदार प्रसन्ना आचार्य
author img

By

Published : Sep 8, 2020, 4:14 PM IST

नवी दिल्ली - 'जगातील कोणतीही शक्ती अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळं करू शकत नाही, असा इशारा बीजू जनता दल पक्षाचे नेते आणि खासदार प्रसन्ना आचार्य यांनी चीनला दिला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिन यांनी अरुणाचल प्रदेशबाबत केलेल्या वक्तव्याचाही आचार्य यांनी निषेध केला. 'चीनने अरुणाचल प्रदेशला कधीही मान्यता दिली नसून हा भाग दक्षिण तिबेटला भाग आहे', असा दावा लिजिन यांनी अधिकृत वक्तव्यात केला होता. त्यावर आचार्य यांनी उत्तर दिले.

ओडिशाचे लोकसभा खासदार प्रसन्ना आचार्य यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना चीनच्या वक्तव्याचा निषेध केला. ' अरुणाचल प्रदेश भारताचा भाग नाही, असे चीन वारंवार म्हणत आहे. ही एक जुनी कथा आहे. अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे जगाने मान्य केलं आहे. चीन हे सत्य का नाकारत आहे? याचं मला आश्चर्य वाटतंय', असे आचार्य म्हणाले.

चीन लष्करासोबत सीमेवर वाढलेला तणाव निशंक दुर्देवी आहे. भविष्यात काय होणार आहे, याचे संकेत मिळत आहेत. भारत सरकार आणि लष्कराने सीमेवर सतर्क राहायला हवे. वैयक्तिक मला वाटते की, चीनसोबतच्या चर्चेवर आपण विश्वास ठेवायला नको. कारण, इतिहासात जेव्हा कधी चीनसोबत करार झाला, पुढील २४ ते ४८ तासात त्यांनी उल्लंघन केले, असे आचार्य म्हणाले.

चीनने करारांचे उल्लंघन केले असून सीमेवर आक्रमक हालचाली केल्याचा आरोप आज सकाळी भारतीय लष्कराने केला. तसेच चिनी लष्कराने मंगळवारी हवेत गोळीबार केल्याचा आरोप केला. भारत चीनमध्ये सीमेवरील तणाव मागील ४ महिन्यांपासून सुरू असून ऑगस्ट ३० च्या रात्री नव्याने चीनने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.