नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसून ते व्हेंटिलेटरवरच आहेत, असे लष्कर रुग्णालय प्रशासनाने रविवारी सांगितले. गेल्या 10 ऑगस्टला प्रणव मुर्खजी यांच्या मेंदूमध्ये गाठ आढळल्याने शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करत गाठ काढण्यात आली.
मुखर्जी यांची कोरोनाची लागण असल्याचेही समोर आले असून त्यांना फुप्फुसात संसर्ग असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉक्टरांकडून त्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान, प्रणव मुर्खजी यांचे पुत्र आपल्या वडिलांच्या प्रकृतीविषयी नियमितपणे लोकांना माहिती देत आहेत. अभिजीत यांनी वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होत. त्यांनी 2012 त 2017 दरम्यान राष्ट्रपती पद भूषविले होते. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. जवळपास ते 5 दशक भारतीय राजकारणात सक्रिय आहेत.