ETV Bharat / bharat

बिहार निकालानंतर नितीश कुमारांची आरजेडीसोबत जाण्याची तयारी; पासवानांचा दावा - चिराग पासवान न्यूज

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याची तयारी केली असल्याचा दावा लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे.

Nitish Kumar will ditch BJP to join RJD after poll results: Chirag Paswan
बिहार निकालानंतर नितीश कुमारांची आरजेडीसोबत जाण्याची तयारी; पासवानचा दावा
author img

By

Published : Oct 28, 2020, 10:09 AM IST

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अशात, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी निवडणुकीनंतर राष्ट्रीय जनता दलासोबत जाण्याची तयारी केली असल्याचा दावा लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाल्यानंतर त्यांनी हा दावा केला आहे.

चिराग पासवान यांनी काही तासांपूर्वी एक ट्विट केले आहे. नितीश कुमार यांना दिलेले मत हे फक्त बिहारला कमकुवत करणारे नाही तर ते आरजेडी आणि महाआघाडीला मजबूत करेल. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाला सोडून आरजेडीसोबत जाण्याची तयारी केली आहे. याआधी त्यांनी आरजेडीच्या आर्शिवादाने सरकार बनवले आहे, असे ट्विटमध्ये म्हटलं आहे.

  • आदरणीय @NitishKumar जी को दिया गया एक भी वोट ना सिर्फ़ बिहार को कमजोर और बर्बाद करेगा बल्कि आर॰जे॰डी॰ व महागठबंधन को मज़बूत करेगा।चुनाव के परिणामों के बाद भाजपा को छोड़ आर॰जे॰डी॰ के साथ जाने की तैयारी कर चुके है साहब।आर॰जे॰डी॰ के आशीर्वाद से पहले भी सरकार बना चुके है।#असम्भवनीतीश

    — युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बिहार १५ वर्षांआधी बदनाम होते. त्यानंतर आता बिहार वाईट अवस्थेत आहे. आता तुमच्या साथीने बिहारला नितीशमुक्त करुन नंबर वन करायचे आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनला दलापेक्षा अधिक जागा लोक जनशक्ती पक्ष लढवत आहे. आम्ही नितीश कुमार यांच्यापेक्षा जास्त जागा जिंकून भाजपा-लोक जनशक्ती पक्षाचे सरकार स्थापन करू, असे चिराग पासवान यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील ७१ जागेसाठी आज मतदान होत आहे. यात दोन कोटींहून अधिक नागरिक १ हजार ६६ उमेदवारांमधून आपले आमदार निवडतील. कोविड काळात पहिल्यांदाच मतदान होत असून यात किती मतदार आपला हक्क बजावणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

किती मतदार आपला हक्क बजावणार -

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात २.१४ करोड मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १.०१ करोड महिला तर ५९९ तृतीयपंथी आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांमध्ये ९५२ पुरूष तर ११४ महिला आहे. गया सिटी मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार असून त्यांची संख्या २७ इतकी आहे. तर सर्वात कमी उमेदवार बांका जिल्ह्यातील कटोरिया विधानसभेच्या जागेवर आहेत. येथे ५ हून कमी उमेदवार रिंगणात आहेत.

कोणता पक्ष किती जागेवर लढवत आहे निवडणूक -

पहिल्या टप्प्यातील निवडणूकीत ७१ जागेसाठी मतदान होत आहे. यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष ३५ जागेवर निवडणूक लढवत आहे. तर नितीश यांचा सहकारी पक्ष भाजपाने २९ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत. विरोधी पक्षाचे सांगायचे झाल्यास राजद ४२ तर काँग्रेस २० जागेवर लढत देत आहे. याशिवाय चिराग पासवान यांचा लोकशक्ती पक्षाने ४१ जागेवर आपले उमेदवार उतरवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.