नवी दिल्ली - मोटर वाहन दुरुस्ती विधेयक 2019 आज बुधवारी राज्यसभेत पास झाले आहे. ट्रफिक नियम तोडल्यानंतर भरण्यात येणाऱ्या चलानची रक्कम 10 ट्क्क्यांनी वाढवण्यात आली आहे.
-
Union Road Transport Minister, Nitin Gadkari on the passing of Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 in Rajya Sabha: 5 lakh accidents happen in our country causing 1.5 lakh deaths, every year. We are number one in accidents in the world, now we've got the chance to correct this. pic.twitter.com/BauLEtBx1K
— ANI (@ANI) July 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Union Road Transport Minister, Nitin Gadkari on the passing of Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 in Rajya Sabha: 5 lakh accidents happen in our country causing 1.5 lakh deaths, every year. We are number one in accidents in the world, now we've got the chance to correct this. pic.twitter.com/BauLEtBx1K
— ANI (@ANI) July 31, 2019Union Road Transport Minister, Nitin Gadkari on the passing of Motor Vehicles (Amendment) Bill, 2019 in Rajya Sabha: 5 lakh accidents happen in our country causing 1.5 lakh deaths, every year. We are number one in accidents in the world, now we've got the chance to correct this. pic.twitter.com/BauLEtBx1K
— ANI (@ANI) July 31, 2019
देशभरात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरवर्षी सुमारे १.५ लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. अपघाताची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले.
हेल्मेट नसल्यास हजार रुपये दंड-
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दुरुस्ती विधेयकामध्ये कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. विना हेल्मेट फिरल्यानंतर पुर्वी 100 रुपयांचे चलान लागत होते. मात्र आता 1 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याचबरोबर विधेयकात तीन महिण्यासाठी लायसन्स जप्त करण्याचा नियम आहे.
वाहन चालवताना फोनवर बोलल्यास ५ हजार दंड-
वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यामुळे अपघात होतात. याची गंभीर दखल या विधेयकात घेतली आहे. वाहन चालवताना फोनवर बोलल्यास 1000 रुपये दंड भरावा लागत होता. आता ५ हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
लायसन्स नसल्यास-
लायसन्स नसल्यास पुर्वी 500 रुपयांची चलान द्यावे लागायचे मात्र आता 5000 रुपये भरावे लागणार आहेत.
दारू पिऊन गाडी चालवल्यास-
तर याचबरोबर मद्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कडक नियम करण्यात आला आहे. पुर्वी कलम 185 नुसार 2 हजार रुपये भरावे लागत होते. तर आता 10 हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे.
परवान्याशिवाय गाडी चालवल्यास ५ हजार दंड -
परवान्याशिवाय गाडी चालवणाऱ्यास कलम १८१ अन्वये ५०० रुपये दंड आकारण्यात येत होता. आता दंडाची रक्कम ५ हजार करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकेचा रस्ता अडवल्यास दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर अल्पवयीन मुलांनी गाडी चालवल्यास २५ हजार रुपये दंड आणि ३ वर्षाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. बसमधून विना तिकिट प्रवास केल्यास दोनशे रुपयांऐवजी ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याचबरोबर हिट अँड रन केसमध्ये मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांना केवळ २५ हजाराची भरपाई मिळायची. आता ही रक्कम वाढवून दोन लाख करण्यात आली आहे.