कोची (केरळ) - केरळमधील सोने तस्करीचे धागेदोरे थेट दाऊदपर्यंत पोहोचल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) संशय आहे. याबाबतचा विशेष अहवाल एनआयएने कोचीमधील न्यायालयात दाखल केला आहे.
सोने तस्करी प्रकरणातील सात जणांनी जामिनसाठी न्यायालयात अर्ज केला. त्यावर तपास संस्थेने आक्षेप नोंदवित जामिनला विरोध केला आहे. आरोपी रमेश केटी आणि शफरुद्दीन यांनी टाझांनियमाध्ये प्रवास केला आहे. तसेच आफ्रिकेत बंदूक विक्रीच्या दुकानांना आरोपींनी भेट दिली आहे. सीमा शुल्क विभागाने विमानतळावरून ५ जुलैला ३० किलो तस्करीचे सोने जप्त केले. त्यानंतर केरळमधीस सोने तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.