राजस्थानात जोरदार पावसामुळे मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू, ५० जखमी
बाडमेर - जिल्ह्यातील जसोल या गावात येथे जोरदार वारा आणि पावसामुळे रामकथा मंडप कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. तर, ५० हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अद्याप बचावकार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सविस्तर वाचा...
मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्या - उद्धव ठाकरे
अहमदनगर - मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही, ते वेळ आल्यावर बघू, एक दोन निवडणुका जिंकल्याने हुरळून जाण्याची गरज नाही. सध्या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर येथे शेतकरी मेळाव्यात केले. त्यांच्या या वक्तव्याने आगामी मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर पडदा पडण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा...
विधानसभेपूर्वी काँग्रेसला धक्का, दुष्यंत चतुर्वेदींनी हातात घेतले 'शिवधनुष्य'
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पक्षांतराला उधाण आले आहे. नागपूर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री सतीश चतुर्वेदी यांचा मुलगा दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज हातात शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुष्यंत यांनी आज शिवसेनेते प्रवेश केला. सविस्तर वाचा...
चिपळूणमधील क्वाॅलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट; २ कामगार जखमी
रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील बहादूरशेख नाका येथील क्वाॅलिटी बेकरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन २ कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. आज (रविवार) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या बेकरीचे बांधकाम अनधिकृत असून, या स्फोटाची चौकशी पूर्ण होईपर्यंत बेकरी सुरु करू नये, अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रशासनाकडे केली आहे. सविस्तर वाचा...
शिक्षणमंत्र्यांच्या पुण्यातील कार्यक्रमात नागरिकांचा गोंधळ
पुणे - नव्याने शिक्षणमंत्री पदाचा भार स्वीकारलेल्या आशिष शेलार यांचा पुण्यात जाहीर कार्यक्रम सुरू आहे. हेल्दी ग्लोब स्मार्ट वर्चुअल एज्युकेशन या शैक्षणिक कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत. या क्रायक्रमात त्यांचे भाषण सुरू असताना काही नागरिकांनी त्यांच्या समोर येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. सविस्तर वाचा...