पणजी - कोरोनामुक्त झालेल्या एका व्यक्तीला गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 38 झाली आहे. तर एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने बाधित रुग्णांची संख्या 69 झाली आहे. त्यापैकी अॅक्टिव्ह रुग्ण 31 आहेत.
गोवा राज्यात प्रवेश करण्यासाठी राज्य सरकारने मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. त्यामुळे त्याचा लाभ घेत गोमंतकीय घरी परतत आहेत. गुरुवारी दिवसभरात 983 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ज्यामध्ये 886 जणांचे अहवाल नकारात्मक तर एकाचा अहवाल सकारात्मक आला असून 96 अहवालांची प्रतीक्षा आहे.
गुरुवारी दिवसभरात 416 आंतरराष्ट्रीय प्रवाशांना, देशांतर्गत 26 प्रवाशांना होमक्वारंटाईन करण्यात आले. फेसिलिटी क्वारंटाईनमध्ये 21 जण तर इस्पितळातील विलगीकरण कक्षात 2 संभाव्य रुग्णांना भरती करण्यात आले. आतापर्यंत 14 हजार 782 जणांचे नमुने तपासण्यात आले आहेत. ज्यामधील 14 हजार 686 अहवाल प्राप्त झाले आहेत.